Wednesday, December 11, 2024 11:50:24 AM

Mumbai
राज कुंद्रा - शिल्पा शेट्टीच्या घरावर सकाळीच ईडीची धाड

आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने देशात पंधरा ठिकाणी धाड टाकली. यात राज कुंद्रा - शिल्पा शेट्टी यांच्या मुंबईतील घराचाही समावेश आहे.

राज कुंद्रा - शिल्पा शेट्टीच्या घरावर सकाळीच ईडीची धाड

मुंबई : आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने देशात पंधरा ठिकाणी धाड टाकली. यात राज कुंद्रा - शिल्पा शेट्टी यांच्या मुंबईतील घराचाही समावेश आहे. ईडीने शुक्रवार 29 नोव्हेंबरच्या सकाळीच राज कुंद्रा - शिल्पा शेट्टी यांच्या मुंबईतील घरावर धाड टाकली. महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशसह देशात वेगवेगळ्या पंधरा ठिकाणी ईडीचे धाडसत्र सुरू आहे. बिटकॉईनद्वारे आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी ईडीची कारवाई सुरू असल्याचे वृत्त आहे.

याआधी 2021 मध्ये मुंबई पोलिसांनी राज कुंद्राला अटक केली होती. पैसे मोजणाऱ्यांना मोबाईल अॅपद्वारे अश्लील फोटो - व्हिडीओ आदी साहित्य उपलब्ध करून देणे आणि मिळालेल्या पैशांद्वारे आर्थिक गैरव्यवहार करणे हा प्रकार बिनबोभाट सुरू होता. हा उद्योग उघड झाला आणि पोलिसांनी कारवाई केली. न्यायालयाने वेळोवेळी पोलिसांच्या तपासाचा आढावा घेतला आणि ठोस पुरावे सादर होत नसल्यामुळे राज कुंद्राला जामीन दिला होता. पण ईडीने बिटकॉईन व्यवहारांशी संबधित माहिती हाती आल्यामुळे धाडसत्र सुरू केल्याचे वृत्त आहे. 

नियमानुसार ईडीची धाड सुरू होते त्यावेळी तिथे असलेल्यांना विनापरवानगी बाहेर जाता येत नाही तसेच कोणाशी संपर्क साधता येत नाही. यामुळे ईडीच्या धाडीबाबत अद्याप राज कुंद्रा - शिल्पा शेट्टी यांच्याकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. 

अभिनेत्री आणि व्यावसायिक शिल्पा शेट्टी हिचा पती राज कुंद्रा हा पण एक व्यावसायिक आहे. राज कुंद्रा मोबाईल स्ट्रीमिंग अॅपद्वारे करत असलेला व्यवहार आधी 2021 मध्ये वादाच्या भोवऱ्यात सापडला. यावेळी बिटकॉईन प्रकरणी ईडीने कारवाई केली आहे. या प्रकरणी अद्याप राज कुंद्रा - शिल्पा शेट्टी यांच्याकडून प्रतिक्रिया आलेली नाही. 


सम्बन्धित सामग्री






jaimaharashtranews-logo