बीड: बीड जिल्ह्यातील गेवराई शहरात माणुसकीला काळी फासणारा प्रकार घडला आहे. एका दारुड्या बापाने स्वतःच्या गतिमंद मुलीला जनावरांच्या गोठ्यात पायाला दोरी बांधून डांबले होते. इतकंच नाही, तर तिला जिवंतपणी केळी आणि टरबूजाची साल खायला देऊन मरणयातना दिली. मात्र, जेव्हा गतिमंद मुलीने हंबरडा फोडला, तेव्हा हा प्रकार तिथे असलेल्या एका महिलेच्या निदर्शनास आला आणि त्या महिलेने गतिमंद मुलीला दत्तक घेण्याचा प्रयत्न केला. तब्बल सहा महिन्यांच्या अथक परिश्रमानंतर सोमवारी दामिनी पथकाच्या मदतीने गतिमंद मुलीचा कायदेशीर पुनर्वसन होण्याचा मार्ग मोकळा झाला.
हेही वाचा: डिलिव्हरी बॉयचा मराठी बोलण्यास नकार; भांडूपमध्ये मराठी दाम्पत्याचा आग्रह
नेमकं प्रकरण काय?
बीड जिल्हा येथील गेवराई शहरात हृदयद्रावक घटना घडली आहे. आईच्या मृत्यूनंतर दारुड्या बापाने पाच वर्षांच्या गतिमंद मुलीला जनावरांच्या गोठ्यात पायाला दोरी बांधून डांबले होते. तसेच, तिला केळी आणि टरबुजाच्या साली खायला देऊन अमानुष मरणयातना दिली. मात्र, जेव्हा हिना नावाच्या महिला माहेरी आल्या होत्या, तेव्हा त्यांना एका लहान मुलीच्या रडण्याचा आवाज सतत ऐकू येऊ लागला. जेव्हा त्या महिला गोठ्यात पोहोचल्या, तेव्हा त्यांनी रिहाना नावाच्या गतिमंद मुलीच्या पायाला दोरीने बांधलेल्या पाहिले. तेव्हा हिना नावाच्या महिलेला अश्रू अनावर झाले आणि त्यांनी गतिमंद मुलीची सुटका करून तिला हज हाउसजवळील खालिद अहमद यांच्या अनाथ आश्रमात आणले. खालिद यांनी तिच्यावर उपचार केले. मात्र, आश्रमात बहुतांश मुले असल्यामुळे त्यांनी छत्रपती संभाजीनगर दामिनी पथकाची मदत घेतली. त्यामुळे दामिनी पथक यांच्या मदतीने कायदेशीर पुनर्वसन होण्याचा मार्ग मोकळा झाला.