पुणे: गेल्या काही दिवसांपासून विद्येच्या माहेरघरात विविध घटना घडत आहेत. एकीकडे पुण्यातील आझम कॅम्पसमध्ये काही विद्यार्थ्यांनी कोयत्याने आणि हातोड्याने मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस झाला आहे. तर दुसरीकडे फसवणुकीचा नवा फंडा समोर आला आहे. डेटिंग अॅप्सद्वारे मुली मुलांना महागड्या हॉटेल्समध्ये घेऊन जातात. त्यानंतर, खाण्या-पिण्याचे हजारो रुपयांचे बिल बनवले जातात. न घेतलेल्या गोष्टी देखील या बिलमध्ये लावल्या जातात. त्यानंतर, 'बिल भरा', असं म्हणून मुली निघून जातात. यानंतर, 'याच हॉटेलमधून मुली त्यांचे वीस टक्के कमिशन हॉटेल वाल्यांकडून घेतात', असा आरोप केला जात आहे. मागील आठ दिवसात असे प्रकार पुण्यामध्ये घडत असल्याची माहिती समोर आली आहे. शनिवारी देखील पुण्यातील खराडी परिसरामध्ये घडला असाच प्रकार घडला होता.
हेही वाचा: लक्ष्मण हाकेंनी 7 दिवसात अजित पवारांची माफी मागावी; नितीन यादवांची हाकेंना नोटीस
सोशल मीडियाचा वापर जेवढ्या चांगल्या गोष्टींसाठी केला जातो, तितकाच चुकीच्या गोष्टींसाठी सुद्धा केला जातो. अनेकदा काही मुलं मुली डेटिंग ॲप्सवर बोलताना भावनिक दृष्ट्या नात्यांमध्ये गुंतले जातात. तर काही मुली वेळ जात नाही म्हणून मुलांसोबत मेसेजवर जोडलेल्या असतात. पण त्याच डेटिंग ॲप्सवर त्यांना कोणी नवीन मुलगा भेटला की त्या पुन्हा त्याच्यासोबत मेसेज किंवा चॅटवर जोडल्या जातात. यामुळे भावनिक फसवणूक होण्याची शक्यता असते. त्यामुळे, सोशल मीडियावर किंवा कोणत्याही डेटिंग ॲप्सवर एखाद्या नवीन मुला-मुलींना भेटणे काही वेळा धोकादायक ठरू शकते. अनेक घटनांमध्ये असे उघडकीस आले आहे की ऑनलाइन संभाषणानंतर एखाद्याला भेटून त्याची लुटमार, हिंसाचार किंवा इतर प्रकारचे गुन्हे घडले आहेत. त्यामुळे डेटिंग ॲप्सवर कोणत्याही नवीन मुला-मुलींसोबत ओळख करताना वेळीच सावध व्हावे.