पुणे: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) गट ब सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 चे आयोजन 2 फेब्रुवारी रोजी होणार आहे. मात्र, या परीक्षा संदर्भात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. काही विद्यार्थ्यांना परीक्षेची प्रश्नपत्रिका आदल्या रात्री उपलब्ध करून देण्याचे आमिष दाखवून बेनामी फोन आले आहेत. या फोनवर 40 लाख रुपये देऊन विद्यार्थी क्लास-2 अधिकारी होण्याचे आश्वासन दिले जात होते.
विद्यार्थ्यांद्वारे मिळालेल्या कॉल रेकॉर्डिंग "जय महाराष्ट्र" च्या हाती लागली आहे. कॉल रेकॉर्डिंगमध्ये आरोपी विद्यार्थ्यांना परीक्षा आधी प्रश्नपत्रिका मिळवून देण्याची गुप्त माहिती देण्याचे आश्वासन देत आहेत.
हेही वाचा 👉🏻👉🏻 घाटकोपर पोलिसांची धडक कारवाई, २० वर्षे राहणाऱ्या बांगलादेशी घुसखोरांना अटक
या प्रकरणामुळे एमपीएससी विभागात खळबळ माजली आहे. प्रशासनाने त्यावर त्वरित कारवाई सुरू केली असून, संबंधित लोकांना पकडण्यासाठी शोध घेतला जात आहे. एकाच वेळी, विद्यार्थ्यांमध्ये घबराट देखील आहे, कारण अशा प्रकारच्या घोटाळ्यामुळे परीक्षेची निष्पक्षता आणि विश्वसनीयता धोक्यात आली आहे. त्याचबरोबर शासनाकडून विद्यार्थ्यांना अशा प्रकारच्या गोड आमिषांपासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.