Monday, February 10, 2025 12:06:39 PM

Saif Ali Khan Attack
सैफ अली खान हल्ल्याप्रकरणातील आरोपी पोलिसांच्या ताब्यात; संशयित आरोपी कोण आणि का केला हल्ला?

सैफ अली खान हल्ला प्रकरणातील आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे. संशयित आरोपी दीपक कनोजिया याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

सैफ अली खान हल्ल्याप्रकरणातील आरोपी पोलिसांच्या ताब्यात संशयित आरोपी  कोण  आणि का केला हल्ला

मुंबई : सैफ अली खान हल्ला प्रकरणातील आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे. संशयित आरोपी दीपक कनोजिया याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. छत्तीसगड मध्यप्रदेश बॉर्डरवर असलेल्या दुर्ग येथून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले. या प्रकरणात मुंबई पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.

हा संशयित एक्स्प्रेस ट्रेनमध्ये असल्याची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी त्यांच्या समकक्षांच्या मदतीने त्या व्यक्तीला ट्रेनमधून खाली उतरताना पकडले. ताब्यात घेतलेला प्रवासी सैफ अली खान हल्ला प्रकरणातील संशयित आरोपीसारखा असल्याचे सांगण्यात येत असून पोलीस सध्या अधिक तपास करत आहेत. संशयिताला छत्तीसगडमधील दुर्ग जिल्ह्यातून ताब्यात घेण्यात आले असून हल्ल्यातील त्याची भूमिका निश्चित करण्यासाठी ते संशयिताची चौकशी करत आहे. दरम्यान सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी सैफची पत्नी अभिनेत्री करीना कपूरची प्रतिक्रिया समोर येत आहे. दागिने समोर असूनही चोरले नाहीत. तर हल्लेखोराने एक कोटी रूपये मागितले असे अभिनेत्री करीना कपूर म्हणाली आहे. 

जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी  व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.

 

करीनाचा जबाब

सैफवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी बोलताना करीना म्हणाली, चोर घरात शिरल्याचे पाहिल्यानंतर केअर टेकर लिमानं आरडाओरड केली. मी आणि सैफनं त्या खोलीच्या दिशेने धाव घेतली. याच खोलीच मुलगा असल्याने मला चिंता लागली होती. या खोलीत मौल्यवान वस्तू, दागिने असताना त्या चोरीला गेल्या नाहीत. आरोपीनं चाकूचा धाक दाखवून लिमाकडे 1 कोटीची मागणी केली. अज्ञात व्यक्ती घरात चाकू घेऊन असल्याचं पाहिलं आणि मी घाबरले. सैफवरच्या हल्ल्यानंतर मी आणि लिमानं मदतीसाठी आरडाओरड केली. तो थरारक प्रसंग अजूनही डोळ्यासमोर उभा राहतो. मानसिक धक्का लागल्यानं मला करिष्मा तिच्या घरी घेऊन गेली असे करीना म्हणाली आहे.

हेही वाचा : छगन भुजबळांची नाराजी कायम

रात्री काय घडलं ?

बुधवार, 15 जानेवारी 2025 रोजी रात्री दोन वाजता एलियामा फिलिप हिला घरात आवाज आला. एलियामा फिलिप ही सैफच्या कुटुंबातली मोलकरीण आहे. एलियामा हिला बाथरूममध्ये प्रकाश दिसला. बाथरूममध्ये एलियामा फिलिप हिला सावली दिसताच ती सतर्क झाली. बाथरूममधून अचानक एक व्यक्ती बाहेर आली. बाहेर आलेल्या व्यक्तीने एलियामाला गप्प बसण्यास सांगितले. त्यावेळी, घुसखोराच्या हातात लाकूड आणि धारदार ब्लेड होतं.अज्ञात व्यक्तीने एक कोटी रुपये एलियामाकडे मागितले. याचवेळी सैफ आणि करीना बेडरूममध्ये पोहचले. घुसखोराने सैफला पाहताच त्याच्यावर हल्ला चढवला. सैफने हल्लेखोराचा प्रतिकार केला. हल्ल्यात सैफ जखमी झाला. सैफने कुटुंबाला घटनास्थळापासून दूर नेले. आरोपी हल्ल्यानंतर घरातून पसार झाला. कुटुंबाने सैफला रिक्षातून रुग्णालयात दाखल केलं.


सम्बन्धित सामग्री