उत्तर प्रदेश: उत्तर प्रदेशातील कानपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गरिबीमुळे त्रस्त असलेल्या एका पती-पत्नीने असे पाऊल उचलले की त्यांना तुरुंगात जावे लागले. आनंदी दिवाळी साजरी करण्याच्या आशेने या जोडप्याने एका नवजात बाळाची चोरी केली. तक्रार मिळताच पोलिसांनी आरोपींना पकडण्यासाठी मोहीम सुरू केली. अखेर आरोपी जोडप्याला अटक करण्यात आली.
नेमकं प्रकरण काय?
कानपूरमध्ये गरिबीमुळे हैराण झालेल्या एका व्यक्तीने दिवाळी साजरी करण्याच्या आशेने दीड महिन्याच्या बाळाची चोरी केली. नौबस्ता पोलीस स्टेशन परिसरातून बेपत्ता झालेल्या बाळाच्या प्रकरणात पोलिसांनी यश मिळवले आहे. बाळ सुरक्षितपणे सापडले आहे आणि बाळ चोरणाऱ्या पती-पत्नीला अटक करण्यात आली आहे.
हेही वाचा: Shirdi Crime : शिर्डी साई संस्थान प्रशासनात मोठा घोटाळा उघड; 47 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल
कानपूरच्या नौबस्ता परिसरातून दीड महिन्याचे बाळ अचानक गायब झाले. बाळ बेपत्ता झाल्याची बातमी कळताच परिसरात खळबळ उडाली. पीडित दाम्पत्याने पोलिसांकडे बाळ हरवल्याची तक्रार दाखल केली. तपासादरम्यान, पोलिसांना असे आढळून आले की, बाळ एका बदमाश कर्मचाऱ्याने चोरले आहे.
आरोपींनी भाड्याने अपार्टमेंट देण्याचे आमिष दाखवून जोडप्याला आणले आणि नंतर त्यांना दारू पाजली. जेव्हा जोडपं दारूच्या नशेत झोपी गेलं तेव्हा आरोपींनी परिस्थितीचा फायदा घेत बाळााला घेऊन पळ काढला. पोलिसांनी तात्काळ एक पथक तयार करून आरोपीचा शोध सुरू केला.
सीसीटीव्ही फुटेज आणि माहिती देणाऱ्यांच्या मदतीने पोलिसांनी काही तासांतच आरोपी जोडप्याला अटक केली. बाळाला सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आणि त्याच्या कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आले. बाळ परत मिळाल्यानंतर दुःखी पालकांचे चेहरे आनंदाने फुलले. त्यांनी कानपूर पोलीस आणि आयुक्तालय पथकाचे आभार मानले. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, अटक केलेल्या जोडप्यावर उन्नाव जिल्ह्यात आधीच आठ गुन्हे दाखल आहेत.