Jalna Crime News: जालना जिल्ह्यातील सोमठाणा गावातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका महिलेने तिच्या दिरासोबत मिळून तिच्या पतीला संपवलं. मृत व्यक्तीचे नाव परमेश्वर राम तायडे असे आहे. घटनेची माहिती गुरुवारी सकाळी समोर आली, जेव्हा तायडे यांचा मृतदेह सोमठाणा तलावात पोत्यात तरंगताना आढळला. तपासणीनंतर मृतदेहाची ओळख पटली. दरम्यान, घटनेची माहिती मिळताचं पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा करून साक्षीदारांचे अहवाल नोंदवले. पीडित व्यक्तीचे वडील राम नाथ तायडे यांनी तक्रार दाखल करत खुनाचा गुन्हा नोंदवला.
हेही वाचा - Sambhajinagar Crime : संभाजीनगर हादरलं! नळकांडी पुलाजवळ भाजप नेत्याची डेड बॉडी सापडली, घातपाताचा संशय; कारण...
चौकशीत उघड झाले भयंकर सत्य
पोलीसांनी तपास सुरु केला असता तायडे यांच्या पत्नी मनीषा आणि धाकटा भाव ज्ञानेश्वर यांची चौकशी सुरू केली. सुरुवातीला दोघांनी टाळाटाळ केली, परंतु सखोल चौकशीदरम्यान त्यांनी परमेश्वर यांना संपल्याची कबुली दिली. तपासात समोर आले की, मनीषा आणि ज्ञानेश्वर यांच्यात प्रेमसंबंध होते आणि परमेश्वर तायडे या नात्याला अडथळा ठरत होता. यामुळे दोघांनी मिळून परमेश्वर यांना संपवण्याचा कट रचला.
हेही वाचा - 'लग्नानंतर हे लोक माझे काय करतील', लग्नाच्या मिरवणुकीत असं काय घडलं की वधूने थेट लग्नचं मोडलं
हत्या केल्यानंतर, मनीषा आणि ज्ञानेश्वर यांनी परमेश्वर तायडे यांचा मृतदेह पोत्यात भरून, दोरीने बांधून सोमठाणा तलावात फेकला. मृतदेह पाण्यावर तरंगू नये म्हणून त्यांनी पोत्यात दगड भरले. या प्रकरणी मनीषा आणि ज्ञानेश्वर यांना अटक करण्यात आली आहे. पोलीस या प्रकरणाचा आणखी तपास करत आहेत.