नात्याला काळिमा! विवाहितेवर मानलेल्या भावाने प्रियकरासह केला अत्याचार
सोलापूर : बार्शी तालुक्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मानलेल्या भावानेच एका विवाहित महिलेसोबत विश्वासघात करून तिच्यावर प्रियकरासह अत्याचार केला आहे. मानलेल्या भावानं व प्रियकरानं मिळून 34 वर्षीय विवाहित महिलेला कारमधून कुर्डूवाडी रस्त्यावरील लॉजवर नेलं. तिथं तिला मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी देत तिच्यावर सामूहिक अत्याचार केला. सुरेश परसु माळी व संतोष भास्कर भानवसे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.
पीडित 34 वर्षीय महिला मागील सात वर्षांपासून सुरेश परसु माळी याच्यासोबत प्रेमसंबंधात होती. तिचा पती पुण्यात सेंटरिंगचे काम करतो. तर ती स्वतः मुलीसोबत बार्शीत वास्तव्यास होती. या प्रेमसंबंधाची माहिती सुरेशच्या मित्राला, संतोष भास्कर भानवसेला होती. तो तिला बहीण मानत होता.
संतोषनं बहिणीच्या नातं लावत पिडित महिलेला विश्वासात घेतलं. त्यानं तू माझी बहीण आहेस. सुरेश तुझं म्हणणं ऐकतो. तु त्याच्या मुलीसोबत माझ्या मुलाचं लग्न जमवून दे, असं सांगितलं. संतोषच्या बोलण्यावरून पीडितेने सुरेशशी बोलून त्याच्या मुलीचं लग्न संतोषच्या मुलाशी लग्न जुळवून दिले. 22 डिसेंबर 2024 रोजी हे लग्न पार पडलं.
हेही वाचा - आदित्य ठाकरेंना वाचवण्यासाठी कितीची डील झाली?, दिशा सालियन प्रकरणावर वकील ओझांनी केला सवाल
पीडिता देखील या लग्नाला आली होती. लग्न झाल्यानंतर पीडितेचा पती जास्त दारूच्या नशेत होता. त्यामुळे सुरेश माळी व संतोष भानवसे यांनी त्याला वऱ्हाडाच्या गाडीत पाठवून दिलं. त्यानंतर दोघांनी पीडितेला तिच्या घरी सोडण्याचे बहाण्याने स्वीफ्ट गाडीत बसवलं आणि कुर्डूवाडी रोडवरील एका लॉजमध्ये नेलं.
लॉजवर पोहोचताच सुरेश आणि संतोषने तिच्यावर अमानुष मारहाण केली. तिनं प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. मात्र दोघांनी तिला जीवे ठार मारण्याची धमकी देत आळीपाळीनं तिच्यावर अत्याचार केला. या घटनेनंतर तिला पुण्यात जाऊन राहण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न केला गेला अन्यथा जीव गमवावा लागेल, अशी धमकी दिली.
हेही वाचा - धारावीमध्ये गॅस सिलेंडर वाहून नेणाऱ्या ट्रकला भीषण आग; सलग स्फोटांमुळे खळबळ
या प्रकाराने धक्का बसलेल्या पीडितेने अखेर हिम्मत करून बार्शी तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत सुरेश माळी व संतोष भानवसे यांच्याविरोधात सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल केला आणि त्यांना अटक करून न्यायालयात हजर केले. सध्या दोघेही पोलीस कोठडीत असून पोलीस उपनिरीक्षक बालाजी वळसने पुढील तपास करत आहेत.