नवी दिल्ली : दिल्ली मद्य धोरण आणि अबकारी घोटाळा प्रकरणी न्यायालयाने आधी मनीष सिसोदिया यांनी जामीन दिला. काही दिवसांतच न्यायालयाने भारत राष्ट्र समितीच्या के. कविता यांनाही जामीन दिला. सिसोदिया आणि के. कविता या दोघांनाही सशर्त जामीन देण्यात आला आहे. के. कविता यांना १५ मार्च रोजी अटक करण्यात आली होती. न्यायालयाने दहा लाख रुपयांच्या मुचलक्यावर के. कविता यांना सशर्त जामीन दिला.