धुळे : धुळ्यात महिला ग्रामसेविकेचा विनयभंग झाल्याची घटना घडली आहे. ग्राम विस्तार अधिकाऱ्याने ग्रामसेविकेकडे शरीर सुखाची मागणी केली. यामुळे ग्राम विस्तार अधिकाऱ्याला चोप दिला आहे. धुळ्यातील शिंदखेडा पंचायत समितीमध्ये कार्यरत असलेला ग्राम विस्तार अधिकारी एस.के.सावकारे याच्या तोंडाला काळे फासत ग्रामसेविकेने त्याला चोप दिला आहे.
ग्रामसेविकेने तक्रार करूनही ग्राम विस्तार अधिकाऱ्यांच्या वर्तवणूकीत बदल झाला नाही. त्यामुळे महिला थेट पंचायत समिती कार्यालयात गेली. ग्राम विस्तार अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फासले आणि त्याला चोप दिला. ग्रामसेविकेसह ठाकरेंच्या सेनेतील कार्यकर्तेदेखील होते. त्यांनीही महिलेला मदत करत ग्राम विस्तार अधिकाऱ्यांला इंगा दाखवला आहे. दरम्यान दोषी अधिकाऱ्यावर तात्काळ कठोर स्वरूपाची कारवाई करण्याची मागणी पीडित ग्रामसेविकेने केली आहे.
सरकारी पदावर कार्यरत असणाऱ्या महिलेला अशा प्रकारे शरीर सुखाची मागणी केल्याचे वर्तन अत्यंत गलिच्छ आहे. तसेच कामावर कार्यरत असताना महिलेचा विनयभंग करणे हे कायद्याने गुन्हा आहे.