Wednesday, December 11, 2024 11:38:04 AM

Crime in Bhandup
कामगाराने केला 3 विद्यार्थिनींचा विनयभंग

मुंबईतील भांडुपमध्ये एका खासगी शाळेत धक्कादायक घटना घडली. शाळेत देखभाल दुरुस्तीची कामं करण्यासाठी आलेल्या कर्मचाऱ्याने तीन अल्पवयीन विद्यार्थिनींचा विनयभंग केला.

कामगाराने केला 3 विद्यार्थिनींचा विनयभंग

भांडुप : मुंबईतील भांडुपमध्ये एका खासगी शाळेत धक्कादायक घटना घडली. शाळेत देखभाल दुरुस्तीची कामं करण्यासाठी आलेल्या कर्मचाऱ्याने तीन अल्पवयीन विद्यार्थिनींचा विनयभंग केला. या प्रकरणी विद्यार्थिनींच्या पालकांनी केलेल्या तक्रारीआधारे पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. भांडुप पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. गोपाल गौडा असे आरोपीचे नाव आहे. या प्रकरणात पुढील पोलीस तपास सुरू आहे. 

काही दिवसांपूर्वी बदलापूर येथे शाळेत शिपाई म्हणून नोकरीला लागलेल्या तरुणाने दोन अल्पवयीन विद्यार्थिनींचा विनयभंग केला होता. हा प्रकार विद्यार्थिनींनी पालकांना दिलेल्या माहितीमुळे उघड झाली. या प्रकरणात मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी स्थानिकांच्या मदतीने आंदोलन उभे केले. आंदोलन तीव्र झाले. पोलिसांनी तपास करुन आरोपीला अटक केली. या प्रकरणातील आरोपीला न्यायालयीन कोठडीत असताना एका वेगळ्या प्रकरणात चौकशीसाठी ताब्यात घेण्याकरिता पोलीस आले. पोलिसांसोबत व्हॅनमधून जात असताना आरोपीने पळण्याचा प्रयत्न केला. आरोपीने पोलिसांचे शस्त्र हाती घेऊन पोलिसांवर गोळीबार केला. अखेर पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी आरोपीवर गोळीबार केला. या गोळीबारात आरोपीचा मृत्यू झाला. ही सर्व माहिती पोलिसांनी प्रसारमाध्यमांना दिली. 

बदलापूरच्या घटनेनंतर आता भांडुपमध्ये तीन विद्यार्थिनींच्या विनयभंगाची घटना चर्चेत आहे. या प्रकरणी पोलीस तपास सुरू आहे. पोलिसांनी विद्यार्थिनींच्या पालकांनी केलेल्या तक्रारीआधारे आरोपीला अटक केली आहे. 


सम्बन्धित सामग्री





jaimaharashtranews-logo