तिरुमला तिरुपती देवस्थानम (Tirumala Tirupati Devasthanam, TTD) मध्ये आणखी एक मोठा घोटाळा समोर आला आहे. 2015 ते 2025 या दहा वर्षांच्या कालावधीत देवस्थानासाठी खरेदी करण्यात आलेल्या 'पाट्टू वस्त्रालु' म्हणजे रेशमी दुपट्ट्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याचे सतर्कता अधिकाऱ्यांनी उघड केले आहे. बनावट आणि कमी दर्जाच्या दुपट्ट्यांची खरेदी करून देवस्थानाला तब्बल 54 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, एका कंत्राटदाराने सुमारे 15,000 दुपट्टे प्रति तुकडा 1389 रुपये दराने देवस्थानाला पुरवले. त्यांना सिल्क आणि पॉलिस्टर मिश्रित असल्याचे दाखवण्यात आले होते. मात्र, नमुने तपासणीसाठी दोन प्रयोगशाळांकडे पाठवण्यात आले असता हे दुपट्टे पूर्णपणे पॉलिस्टरचे असल्याचे स्पष्ट झाले. ज्यात Central Silk Board चा सुद्धा समावेश आहे. म्हणजेच देवस्थानाला सिल्क म्हणून बनावट दुपट्टे पुरवले जात होते.
या घोटाळ्याबाबत प्रतिक्रिया देताना TTD चे अध्यक्ष नायडू म्हणाले, “खरेदी विभागात काही गंभीर अनियमितता आढळल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे. या सर्व प्रकरणाची चौकशी आम्ही ACB (Anti Corruption Bureau) कडे सोपवली आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा: Illegal Exchange Racket: दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई; 3.5 कोटींच्या जुन्या नोटांसह चौघांना अटक
हा घोटाळा उघडकीस येण्यापूर्वी TTD वर आधीच दोन मोठे वादाचे मुद्दे समोर आले होते. सप्टेंबर 2024 मध्ये मंदिरातील Tirupati Laddu Prasadam संदर्भात मोठा वाद निर्माण झाला होता. तत्कालीन आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री यांनी असा दावा केला होता की लाडूमध्ये शुद्ध गाईच्या तुपाऐवजी animal fat अथवा भेसळयुक्त तूप वापरले गेले असू शकते. या वादानंतर CBI Central Bureau of Investigation च्या देखरेखीखाली एक विशेष तपास पथक तयार करण्यात आले आणि लाडू तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या तुपाच्या पुरवठा साखळीची चौकशी सुरू झाली.
याआधीचा आणखी एक मोठा वाद म्हणजे Parakamani Case. एप्रिल 29, 2023 रोजी तिरुमलाजवळील एका मठातील लिपिक सी व्हि रवी कुमार याला भक्तांनी Srivari Hundi मध्ये टाकलेल्या देणग्यांमधून चोरी करताना पकडण्यात आले होते. या प्रकरणात मोठ्या रकमेची देवस्थानाच्या निधीतून चोरी झाल्याचा आरोप आहे. रेशमी दुपट्ट्यांचा नवीन घोटाळा समोर आल्यानंतर TTD च्या खरेदी प्रक्रियेवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. सलग उघड होत असलेल्या घोटाळ्यांमुळे भक्तांमध्ये संताप वाढत असून संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करून दोषींवर कडक कारवाई करावी अशी मागणी वाढत आहे.
हेही वाचा: Mumbai Crypto Fraud: यूएसडीपी करन्सीचे आमिष आणि लाखोंचा गंडा; मुंबईत मोठा क्रिप्टो घोटाळा उघड