बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड याने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आपला या हत्याकांडाशी संबंध नसून आपल्याला याप्रकरणात अडकवण्यात आल्याचा जामीन अर्ज दाखल केला आहे. यापुर्वी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडामध्ये वाल्मिक कराड हाच मुख्य आरोपी असल्याचा दावा करत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठातील मुख्य सरकारी वकिलांनी तसा युक्तीवाद केला आहे. मात्र आता त्यानंतर मुख्य आरोपी वाल्मिक कराड याने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात जामीन अर्ज दाखल केला आहे.
हेही वाचा- Santosh Deshmukh Case : क्रूरतेचा कळस, अमानुषतेची परिसीमा गाठणाऱ्या निर्घृणतेची वर्षपूर्ती; संतोष देशमुखला न्याय कधी?, कुटुंबिय प्रतिक्षेत
दरम्यान या अर्जावर उर्वरीत सुनावणी 16 डिसेंबर रोजी होणार आहे. मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येला आज एक वर्ष पूर्ण झाले असून संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आरोपी वाल्मिक कराडसह या हत्याप्रकरणातील इतर सहभागींवर केज पोलीस ठाण्यात खून आणि मकोका कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर 31 डिसेंबर 2024 पासून आरोपी वाल्मिक कराड अटकेत आहे.
हेही वाचा- वाल्मिक कराडला व्हीआयपी ट्रीटमेंट; कारागृह अधिक्षक बक्सार मुलानींची बदली
यावेळी आरोपी वाल्मिक कराडच्या वतीने जेष्ठ विधीज्ञ शिरीष गुप्ते यांनी युक्तीवाद करताना सांगितले की, वाल्मिक कराड याला चुकीच्या गुन्ह्यात पद्धतीने मकोका लावण्यात आला. देशमुख यांच्या हत्येच्यावेळी तो घटनास्थळापासून शेकडो किलोमीटर दूर होता. खोट्या पद्धतीने कराडला या गुन्ह्यात गोवण्यात आले आहे. कराड याला त्याच्या अटकेची कारणे पोलिसांनी लेखी स्वरुपात दिलेले नाही. यामुळे त्याची अटकच बेकायदेशीर आहे. त्याच्याविरोधात कोणताही पुरावा नसल्याचे नमूद करीत त्यास जामीन देण्याची विनंती यावेळी त्यांनी केली.
हेही वाचा- Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख यांचं पहिलं वर्षश्राद्ध; मुख्य आरोपी कृष्णा आंधळे अद्यापही फरार, देशमुख कुटुंबीय न्यायाच्या प्रतीक्षेत
तर दुसरीकडे वाल्मिक कराड हाच मुख्य सूत्रधार असल्याचा युक्तिवाद सराकारी वकील ॲड. अमरजितसिंह गिरासेगिरासे यांनी केला. यावेळी गिरासे यांनी तारखेनुसार प्रत्येक घटनाक्रम तपशीलवार उलगडून दाखवला. या घटनेतील साक्षीदार, मोबाईल फोन संवादाच्या तपशीलाचा (सीडीआर) अहवाल, सीसीटीव्ही फुटेज, ध्वनिफित मुद्रण, न्यायवैद्यक प्रयोगशाळेचा अहवाल न्यायालयात दाखविण्यात आला.
गेल्यावर्षी 9 डिसेंबर रोजी संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांची अमानुष हत्या करण्यात आली होती. या घटनेने संपूर्ण जिल्हा आणि राज्य हादरले होते. प्रकरणाला संपूर्ण एक वर्ष झाल्यानंतरही न्यायालयात आरोप निश्चित न झाल्याने देशमुख कुटुंबीयांना न्याय मिळाला नाही. तपासात संथगती असल्याचे सांगत गावकऱ्यांनीही उपमुख्यमंत्र्यांसमोर नाराजी व्यक्त केली.