Thu. Jul 18th, 2019

‘वाढीव दिसताय राव’ लावणीवर टिकटॉक करणाऱ्या वाढीव गुन्हेगारास अटक

0Shares

‘टिकटॉक’व्हिडीओ एका वाढीव गुन्हेगाराच्या अंगलट आला आहे. वाकड पोलीसांनी या वाढीव गुन्हेगाराच्या मुसक्या आवळल्या आहेत. या  टिकटॉक विराला पोलीसांनी ताब्यात घेतलं आहे.  दीपक दाखले  असं या गुन्हेगाराचे नाव आहे. वाढीव दिसता राव या गाण्याचे चित्रीकरण हातात कोयत्या सारखं शस्त्र घेऊन केलं आहे. आरोपी दीपक या व्हिडीओ द्वारे परिसरात दहशत माजवत होता. याबाबत वाकड पोलीस अधिक तपास करत आहे.

नेमकं प्रकरण काय?

वाढीव दिसताय राव’.. . या लावणीवर आरोपी दीपक  दाखले याने टिकटॉक व्हिडीओ केला आहे.

हातात कोयत्या सारखं शस्त्र घेऊन हा व्हिडीओ  कल्याने हा प्रकार चांगलाट अंगाशी आला आहे.

दहशत पसरविण्यासाठी ‘टिकटॉक’चा वापर केल्याने त्याला अटक करण्यात आले आहे.

हा ‘व्हिडीओ सोशल मीडिया’वर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

हा ‘व्हिडीओ’ वाकड पोलिसांच्या हाताला लागल्यानंतर पोलीसांनी सापळा रचून पकडले.

या व्हडिओमध्ये वापरण्यात आलेले हत्यार देखील जप्त करण्यात आले आहे.

 

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *