Jaimaharashtra news

संतापजनक! अल्पवयीन भावाचा सख्ख्या बहिणीवर बलात्कार!

बहीण भावाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना नागपूरमध्ये उघडकीस आली आहे. सख्ख्या भावानेच बहिणीवर बलात्कारासारखं भीषण कृत्य केल्यांचं समोर आलं आहे. विशेष म्हणजे पीडित बहीण आणि आरोपी भाऊ दोघेही अल्पवयीन आहेत.

भावाची विकृती, नाती झाली माती!

नागपूरमधील हुडकेश्वर परिसरामध्ये राहणाऱ्या कुटुंबात हा लांच्छनास्पद प्रकार घडलाय.

चार महिन्यांपूर्वी कुटुंबातील पालक बाहेर गेले होते.

घरामध्ये दोघे बहीण भाऊच होते.

यावेळी विकृत भावाने नात्यांची तमा न बाळगता बहिणीला धमकी देत तिच्यावर बलात्कार केला.

ही गोष्ट घरात कुणालाही सांगितलीस, तर मारून टाकेन अशी धमकीच तिला दिली.

घाबरलेल्या बहिणीने सख्ख्या भावाचं हे कृष्णकृत्य कुणालाच सांगितलं नाही.

त्यामुळे ही गोष्ट घरच्यांना समजली नाही.

मात्र यामुळे भावाचं फावलं, आणि तो संधी मिळेल, तसा वारंवार बलात्कार करू लागला.

बहीण झाली गर्भवती!

बहिणीची तब्येत काही दिवसांतच खंगायला लागली.

तिला सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

यावेळी डॉक्टरांनी तपासणी केली असता, मुलगी गर्भवती असल्याचं पुढे आलं.

आपली अल्पवयीन मुलगी गर्भवती असल्याचं समजल्यावर नातेवाईकांना धक्का बसला.

मुलीची त्यांनी कसून चौकशी केली.

तेव्हा आपला सख्खा भाऊच आपल्यावर बलात्कार करत असल्याचं तिने मान्य केलं.

यामुळे जबर धक्का बसलेल्या नातेवाईकांनी थेट पोलीस स्टेशन गाठून आपल्या मुलाविरोधात तक्रार दाखल केली.

हुडकेश्वर पोलिसांनी आरोपी मुलाला ताब्यात घेतलंय.

मात्र तो अल्पवयीन असल्याने त्याची रवानगी बालसुधारगृहात करण्यात येत आहे.

 

Exit mobile version