Fri. Sep 17th, 2021

कहर! फरार गुंडाचा पोलिसाच्या गाडीतून बाहेर पडताना Tik Tok व्हिडिओ!

नागपूरमधील गुंडांना पोलिसांना कसलीही भीती नाही हे परत एकदा सिद्ध झालंय. सय्यद मोबीन अहमद या फरार असलेल्या नामी गुंडाने चक्क पोलिसांच्या गाडी मधून बाहेर पडून फरार होतानाचा टिकटॉक व्हिडिओ तयार केलाय. एवढंच नव्हे तर तो सोशल मीडियावर वायरलही केलाय.

आपण कसे पोलिसांसमोर खुलेआम घुमतो, आपल्याला पोलिसांची कसलीही भीती नाही, असं त्याने या  व्हिडिओत दाखवलं आहे. तो पोलीस व्हॅनमधून swag दाखवत उतरतो असं व्हिडिओमध्ये दिसतंय. तसंच एका मोठ्या कारमधील फुटेजही या tik tok व्हिडिओमध्ये दिसतंय.

हा व्हिडिओ त्याने कधी रेकॉर्ड केला हे कळू शकलं नाही.

मात्र सध्या सय्यद चामा गॅंग चालवत असून त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल असून तो फरार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *