Wed. Nov 13th, 2019

फरार गुंडाचा Tik Tok व्हिडिओ, पोलिसांचा तपास सुरू

तडीपार गुंडाचा पोलीस वाहनात टिक टॉक व्हिडिओ व्हायरल झाल्यावर पोलीस आयुक्तांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. ‘जय महाराष्ट्र’च्या बातमीनंतर आता पोलीसांनी चौकशी सुरू केली आहे.

काय म्हणत आहेत पोलीस उपायुक्त ?

हा व्हिडिओ दीड महिन्यांपूर्वीचा आहे.

त्यावेळी हा गुंड तडीपार नव्हता.

मात्र तरी पोलीस ठाण्याच्या समोर आणि पोलीस वाहनात हा गुंड व्हिडिओ तयार करत असल्यानं पोलीस कर्मचाऱ्यांचा यात दोष आहे का हे ही तपासून बघितलं जाणार आहे.

या प्रकरणात जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याचं पोलीस उपयुक्तांनी सांगितलंय.

कहर! फरार गुंडाचा पोलिसाच्या गाडीतून बाहेर पडताना Tik Tok व्हिडिओ!

काय होता हा व्हिडिओ?

सय्यद मोबीन अहमद या फरार असलेल्या नामी गुंडाने चक्क पोलिसांच्या गाडी मधून बाहेर पडून फरार होतानाचा टिकटॉक व्हिडिओ तयार केलाय. एवढंच नव्हे तर तो सोशल मीडियावर वायरलही केला होता. या व्हिडिओत तो पोलीस व्हॅनमधून swag दाखवत उतरताना दिसत होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *