Fri. Sep 17th, 2021

कोर्टाबाहेर कुख्यात आरोपींचं ‘Tik Tok’!

Tik Tok चं वेड फक्त तरुणांमध्येच नव्हे, तर गुन्हेगारांमध्येही असल्याच्या घटना एकामागोमाग एक समोर येतायत. नागपूर येथे फरार गुंडाने पोलिस व्हॅनमधून TikTok व्हिडिओ बनवल्याची घटना ताजी असतानाच औरंगाबादमध्ये अशाच प्रकारची घटना समोर आली आहे.

म्हणे ‘दुवाओं मे याद रखना…’

औरंगाबादमधून खुनाच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत असलेल्या आरोपींनी कोर्ट परिसरातच टिकटॉक केलाय.

हा TikTok व्हिडिओसुद्धा सध्या सोशल मीडियावर viral होतोय.

या आरोपींची नावं शेख एजाज इब्राहिम आणि शेख इर्शाद इब्राहिम अशी आहेत

Tik Tok व्हिडिओतून ‘रमजान’च्या शुभेच्छा दिल्या आहेत.

‘दुवाओं में याद रखना’ असा फिल्मी डायलॉगही मारलाय.

एवढंच नव्हे तर जेव्हा आपण बाहेर येऊ तेव्हा आपला भाव असाच सुरू राहाणार आहे, असं त्यांनी म्हटलंय.

हे दोघे आरोपी टोळ्यांचे म्होरके आहेत. त्यांतील एक खुनाच्या गुन्ह्यात अटकेत आहे तर दुसऱ्यावर मोक्का लागला आहे.

 

संबंधित बातम्या

कहर! फरार गुंडाचा पोलिसाच्या गाडीतून बाहेर पडताना Tik Tok व्हिडिओ!

फरार गुंडाचा Tik Tok व्हिडिओ, पोलिसांचा तपास सुरू

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *