Tue. Aug 9th, 2022

शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट

यावर्षी पावसानं वेळेवर हजेरी लावल्यानं शेतकऱ्यांनी उत्साहानं पेरणी केली होती.शेतकऱ्यांनी पेरलेले सोयाबीनचे बियाणे उगवलेच नसल्याचा प्रकार अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यात घडला आहे.आठ दिवसात बियाणे न उगवल्याच्या ५० तक्रारी आल्याने या बोगस बियाणांमुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.आता या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीच संकट ओढवल आहे. ८० टक्के शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे. मात्र आठ दिवस उलटूनही सोयाबीन बियाण्याची उगवण न झाल्याने शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे धाव घेतली आहे.

दोन दिवसात पन्नासच्या वर शेतकऱ्यांनी बियाणं निघाल्याचे तक्रार केल्याने तालुका कृषी अधिकारी अनिल कांबळे यांनी अनेक शेतात जाऊन पाहणी सुद्धा केलेली आहे. तातडीने कंपनीने व सरकारने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील ममदापूर, वरखेड, मारडा या गावातील अनेक शेतकऱ्यांनी महाबीज कंपनीचं सोयाबीन पेरलं असून ते उगवलं नसल्याची त्यांची तक्रार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.