Wed. Jun 29th, 2022

कोकणात हापूस आंब्यावर संकट

कोकणातील आंबा हा अर्थकरणाचा महत्त्वाचा घटक मानला जातो. कोकणातील बागायतदारांसाठी आंबा हे उत्पन्न मिळवून देणारे स्त्रोत आहे. मात्र, गेली तीन ते चार वर्षे येथील आंबा बागायतदारांवर आस्मानी संकट कोसळले आहे. कोकणातील बदलत्या हवामानामुळे आंबा बागायतदारांना मोठा फटका बसला आहे. तर आता या बागायतदारांना झालेल्या नुकसानाची भरपाई शासनाकडून अपेक्षित आहेत.

हवामानातील बदल, अधिक उष्णता, अवकाळी पाऊस वादळ, तसेच कोरोनामुळे टाळेबंदी यांचा आंबा उत्पादकांना मोठा फटका बसला असून बागायतदारांची आर्थिक घडी मोडली आहे. तसेच आंब्यावर मावा, तुडतुड्या, करपा यासारख्या रोगांची लागण होत आहे. त्यामुळे आंब्यावर फवारणीसाठी वाढलेला औषधांचा खर्च यासर्वामुळे आंबा बागायतदारांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे शासनाने भरीव मदत करावी अशी अपेक्षा आंबा उत्पादक करीत आहे.

कोकणात हापूस आंब्यावर संकट

आंबा उत्पादनात महाराष्ट्राचा प्रथम क्रमांक.

महाराष्ट्रात आंब्याचे क्षेत्र ३,५७,२ ९ ० हेक्टर.

महाराष्ट्रातील कोकण विभागातील हापूस आंबा निर्यात होतो.

हापूस आंब्यापाठोपाठ केशर आंब्याची मोठ्या प्रमाणात निर्यात.

आंब्यापासून परकीय चलन मोठ्या प्रमाणात मिळतं.

रायगड जिल्ह्यात ५६ ते ६० हजार इतके आंबा बागायतदार.

कोकणात साडेचार लाख आंबा बागायतदार.

१ व २ डिसेंबर २०२१ रोजी अवकाळी पाऊस.

पहिल्या टप्प्यात आंब्याला आलेला मोहोर कुजून गेला.

मावा आणि तुडतुड्याचा मोठ्या प्रमाणात आंब्यावर प्रादुर्भाव.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.