Sat. Nov 27th, 2021

डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत दौऱ्यावर सामनातून टीका

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प कुटुंबियांसह २ दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांचा ३६ तासांचा हा भारत दौरा असणार आहे.

ट्रम्प यांच्या भारत दौऱ्यावर सामना संपादकीयमधून टीका करण्यात आली आहे.

काय म्हटलंय सामनामधून ?

ट्रम्प भारतात व्यापारवाढीच्या उद्देशाने भारतात येत आहेत.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आल्याने येथील गोरगरिब, मध्यमवर्गीय जनतेच्या जीवनात कानामात्रेचा फरक पडणार नसल्यांच सामनातून म्हटलं आहे.

तसेच देशात बेरोजगारी वाढली आहे. आर्थिक मंदिचा कहर सुरु आहे. ट्रम्प यांच्या ३६ तासांच्या भारत भेटीने हे सर्व प्रश्न सुटणार नाहीत.

तरीही प्रे. ट्रम्प या पाहुण्याचे स्वागत करायला हवे.पाहुणचार आणि शिष्टाचारात कुठेही आर्थिक मंदीच्या झळा बसता कामा नयेत. ट्रम्प महाराज यावे, तुमचे स्वागत आहे, असं सामना संपादकीयमधून म्हटलं आहे.

लपवाछपवी जास्त

डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारतातील आगमनानिमित्त अहमदाबादचे रस्ते चकाचक झाले आहेत. तिथल्या झोपड्या दिसू नयेत म्हणून रस्त्याच्या कडेस भिंती उभारल्या गेल्या आहेत.

ट्रम्प यांच्या आगमनापेक्षा या लपवाछपवीचीच जास्त चर्चा सुरु झाली आहे, असं या संपादकीय मधून म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *