Thu. Jan 27th, 2022

मगरीचा मच्छीमार युवकावर हल्ला

रायगड : महाडमधील सावित्री नदीतील मगरीने मच्छीमारावर हल्ला केल्याची घटना घडली आहे. या घटनेत मासेमारी करणारा तरुण गंभीर जखमी झाला आहे. फैजान धनसे असे या मासेमारी करणाऱ्या युवकाचं नाव आहे.

म्हसळा तालुक्यात पांगळोली गाव हद्दीतील सावित्री नदीच्या पात्रात हा प्रकार घडला. मासेमारी करत असताना मगरीने फैजानच्या पायावर हल्ला केला. या हल्ल्यात फैजानच्या डाव्या पायाला खोलवर जखम झाली आहे. दरम्यान फैजानवर खासगी रुग्णालयात उपचार केले जात आहेत.

सावित्री नदीत मोठ्या प्रमाणावर मगरीचे साम्राज्य आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *