Fri. Dec 3rd, 2021

वसई विरार महापालिकेच्या लसीकरण केंद्रावर नागरिकांची तुफान गर्दी

वसई विरार : वसई विरार महापालिकेच्या लसीकरण केंद्रावर नागरिकांची तुफान गर्दी झाली आहे. २ दिवसाच्या प्रतीक्षेनंतर शनिवारी महापालिका क्षेत्रात २१ लसीकरण केंद्रावर कोविशिल्ड लसीचे लसीकरण सुरू करण्यात आले आहे. शासनाकडून ९००० कोविशिल्ड आणि ११०० कोव्हॅक्सीनचा साठा महापालिकेला उपलब्ध झाल्याने आज २१ लसीकरण केंद्रावर हे लसीकरण सुरू केले आहे. १०० ते १५० लसींचा साठा उपलब्ध असताना ३०० ते ४०० नागरिकांच्या रांगा लसीकरण केंद्रावर लागल्या जात आहेत. रांगा लावून सुद्धा लस मिळत नसल्याने विरार पश्चिम विवा कॉलेज लसीकरण केंद्रावर नागरिकांनी संतप्त होत गोंधळ घातला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *