Tue. May 17th, 2022

कोकणात पर्यटकांची गर्दी

कोरोनाने गेल्या दोन वर्षापासून सर्वत्र हाहाकार उडवला होता. कोरोनाने प्रत्येकाच्या घरापाशीच बस्तान ठोकले होते. त्यामुळे सर्वत्र टाळेबंदी करण्यात आली होती. तर मास्कसक्तीसुद्धा करण्यात आली होती. त्यामुळे गेली दोन वर्ष नागरिकांना कुठेही जाता आले नाही. मात्र, आता कोरोना रुग्णसंख्येत घट झाली असल्यामुळे राज्यातील कोरोना निर्बंध हटवण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिक मोकळा श्वास घेऊ लागले आहेत.

उन्हाळी दिवसांच्या सुट्टीत अनेकांचे पाय हे कोकणाकडे सरसवतात. रोजच्या धकाधकीच्या जीवनातून थोडा वेळ काढून फिरण्यासाठी साऱ्या महाराष्ट्रातून लोक पर्यटनासाठी कोकणाकडे वळतात. कोकण महाराष्ट्राला लाभलेली निसर्गरम्य देणगी आहे. आणि त्यामुळेच पर्यटक या कोकण किनारपट्टीला जास्त पसंती देतात. त्यामुळेच आता कोरोनानंतरच्या उन्हाळी दिवसांत अनेकांनी कोकणाला पसंती दिली आहे. त्यामुळे कोकणात पर्यटकांची गर्दी पाहायला मिळत आहे.

महाराष्ट्राला लाभलेला हा विस्तीर्ण समुद्र किनारा. तसेच रत्नागिरीतील गुहागर वेळणेश्वर, गणपतीपुळे, दाभोळ अशा पर्यटन स्थळांकडे पर्यटकांची आपसूकच पावले वळतात. आणि पर्यटकांसाठी धमाल-मस्तीचे ठिकाण म्हणजेच समुद्रकिनारा आहे. या पर्यटकांच्या जीवावरच टांगेवाले, घोडेवाले, उंटवाले ,पॅराग्लायडिंग वाले आपली दिनचर्या चालवित असतात. समुद्र किनार्‍यावरील काही व्हिडिओ वापरावेत, पर्यटक समुद्रकिनारी पाण्यात खेळताना, उंटावरील काही व्हिडिओज आणि पर्यटक समुद्रकिनारी इकडून तिकडे फिरताना, पर्यटक नेहमीच फिरण्यासाठी पहिली पसंती देतात कोकणाला, कारण एप्रिल आणि मे महिन्यामध्ये कोकणामध्ये मुबलक प्रमाणात हापूस, आंबा, कोकम, फणस, काजू, करवंदे, अळू, या आणि अशा अनेक कोकणच्या मेव्याचं मुबलक प्रमाणात मिळणं ही एक पर्वणीच असते. त्यामुळे कोकणकिनार पट्टी पर्यंटकांमुळे गजबजली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.