CRPF जवानानेच केला सहकाऱ्यांवर गोळीबार; तीन जवानांचा मृत्यू

सीआरपीएफच्या जवानाने सहकाऱ्यांवर अंदाधुंद गोळीबार केल्याची धक्कादायक घटना जम्मू-काश्मीरच्या उधमपूर येथे घडली आहे. या गोळीबारात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. अजित कुमार असे गोळीबार करणाऱ्या जवानाचे नाव असून गोळीबार केल्यानंतर त्याने आत्महत्या करण्याचाही प्रयत्न केला. मात्र त्या जवानाला लष्करी रुग्णालयात दाखल केले असून उपचार सुरू आहेत.

 नेमकं काय घडलं ?

उधमपूर येथील बट्टल बलियान येथे सीआरपीएफच्या एका जवानाने आपल्या सहकाऱ्यांवर गोळीबार केल्याची माहिती समोर आली आहे.

ही घटना बुधवारी रात्री सीआरपीएफच्या तळावर घडली आहे.

काही क्षुल्लक कारणावरुन हा गोळीबार केल्याचे समजते आहे.

या गोळीबारात तीन सीआरपीएफच्या जवानांचा मृत्यू झाला.

गोळीबार करणाऱ्या जवानाचे नाव अजित कुमार असून त्याने गोळीबारानंतर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

अजित कुमार याची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर लष्करी रुग्णालयात उपार सुरू आहे.

गोळीबार करणाऱ्या जवानाने आपली  स्वत:ची बंदुक वापरून हा गोळीबार केला.

तसेच या गोळीबारात हेड कॉन्स्टेबल पोखरमल, योगेंद्र शर्मा आणि उम्मिद सिंह यांचा मृत्यू झाला आहे.

 

 

 

 

 

 

Exit mobile version