Sat. Nov 27th, 2021

CSK चा अभिनंदनीय निर्णय, पहिल्या सामन्याचं मानधन शहिदांच्या कुटुंबियांना

पुलवामा हल्ल्यामध्ये मरण पावलेल्या शहिदांच्या कुटुंबियांना मदत करण्याचा निर्णय चेन्नई सुपर किंग्ज ने घेतला आहे. 23 मार्च पासून IPL ला सुरूवात होणार आहे.  यामध्ये सामन्यात मिळणारा निधी पुलवामा हल्ल्यातील शहिदांच्या कुटुंबियांना  देण्याचा स्वागतार्ह निर्णय CSK संघाने घेतला आहे.

लेफ्टनंट कर्नल महेंद्रसिंग धोणी देणार चेक

23 मार्चला चेन्नईमध्ये IPL ला सुरूवात होणार आहे.

यामध्ये चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर बंगळुरू यांच्यात पहिला सामना रंगतोय.

या पहिल्या सामन्यातून मिळणारी सर्व रक्कम पुलवामा हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या चाळीस जवानांच्या कुटुंबियांना देण्याचं जाहीर केले आहे.

CSK चा कर्णधार लेफ्टनंट कर्नल महेंद्रसिंग धोणी  या सर्व रकमेचा चेक शहिदांच्या कुटुंबियांना प्रदान करणार आहे.

यामध्ये ‘आर्मी वेल्फेअर फंड’साठी जवळपास 20 कोटींचा निधी देण्यात येणार आहे.

या सामन्याच्या उद्घाटन प्रसंगी भारतीय सैन्य दलाच्या तीनही विभागांच्या प्रमुखांना आमंत्रित करण्यात आली आहे, अशी माहिती प्रशासकीय समितीचे अध्यक्ष विनोद राय यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *