Tue. Jun 18th, 2019

IPL : CSK चा KKR वर 5 गडी राखून विजय!

39Shares

IPL च्या कोलकाता नाइट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्ज दरम्यान झालेल्या सामन्यात चेन्नईने कोलकात्यावर 5 गडी राखून दणदणीत विजय मिळविला. हा CSK चा IPL च्या या सिझनमधील सातवा विजय आहे.

कसा झाला सामना?

नाणेफेक चेन्नई सुपर किंग्जने जिंकली.

मात्र बॅटिंगची संधी त्यांनी प्रथम KKR ला दिली.

KKR टीमला खरंतर ख्रिस लेनने चांगली सुरुवात करून दिली होती. त्याने 82 धावांचा डोंगर रचला होता.

मात्र त्याच्यानंतर कोलकाता नाईट रायडर्सची टीम चेन्नईच्या बॉलर्सपुढे टिकाव धरू शकली नाही.

KKR टीमने 20 Overs मध्ये 8 गडी गमावत 161 धावांचं लक्ष्य CSK पुढे ठेवलं.

CSK ने 162 धावांचं हे लक्ष्य 19 व्या षटकातील चौथ्या बॉलवरच पूर्ण केलं.

सुरेश रैनाच्या 58 धावांच्या जोरावर चेन्नईला हा विजय प्राप्त करणं शक्य झालं.

सुरेश रैनाने 42 बॉल्समध्ये 7 चौकार आणि 1 sixer लगावत 58 धावा केल्या.

महेंद्र सिंग धोनी या सामन्यात फारशी चांगली कामगिरी करू शकला नाही.

मात्र धोनी तंबूत परतल्यावर रवींद्र जडेजाने रैनाला साथ देत आक्रमक खेळ केला.

जडेजाने 17 बॉल्समध्ये 31 धावा केल्या.

39Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *