Mon. Sep 27th, 2021

पराभवानंतर कोलकाताचा प्लेऑफ साठीचा मार्ग खडतर

राजस्थान,पंजाब,हैद्राबाद यांना चैन्नईच्या विजयामुळे दिलासा…

काल रात्री शेवटच्या ओव्हर पर्यंत रंगलेल्या सामन्यात अखेर चेन्नईने बाजी मारून कोलकाताला धूळ चारली. प्रथम फलंदाजी करत कोलकाता नाईट रायडर्सने १७२ धावा काढल्या ज्यामध्ये नितीश राना ह्याचे ८७ धावांचे योगदान होते. १७२ धावांचा पाठलाग करत असताना चेन्नई सामना हरते असे वाटत असताना रवींद्र जडेजा ह्याने चेन्नईची नौका पार करून दिली. ११ चेंडू मधे ३१ धावांचे योगदान देत जडेजाने सामना चेन्नईला जिंकवून दिला.
चेन्नई हा संघ आयपीएलच्या प्लेऑफ मधून आधीच बाहेर गेला आहे परंतु कालच्या विजयानंतर मुंबई इंडियन्स हा प्ले-ऑफ मध्ये जाणारा पहिला संघ ठरला आहे. उर्वरित ३ संघ कोणते असतील ते अजूनही निश्चीत नाही.असे असले तरी बंगळुरू आणि दिल्ली हे संघ देखील प्ले-ऑफ गाठण्याची शक्यता जास्त आहे.त्यामुळे उर्वरित संघांना ह्या पुढे “करो या मरो” अश्या परिस्थितीमध्ये सामने खेळावे लागणार आहेत.कालच्या पराभवामुळे कोलकाताचा प्ले-ऑफमध्ये जाण्याचा मार्ग अजून खडतर झालेला आहे. तसेच चेन्नईच्या विजयामुळे पंजाब राजस्थान आणि हैद्राबाद संघाला अजून थोडी उम्मीद मिळाली आहे ह्यात शंका
नाही.
कोणता संघ प्ले-ऑफ गाठणार आणि कोणता संघ घरी परतणार हे येणाऱ्या काही दिवसांमध्ये स्पष्ट होईल.मात्र कालच्या चेन्नईच्या विजयामुळे समीकरणे अजून बदलली असून स्पर्धेतील रोमांचकता अजून वाढली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *