Wed. Aug 10th, 2022

CSMT : पूल दुर्घटनेत आणखी एकाला अटक

 

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील पादचारी पुलाचा स्लॅब कोसळल्याची घटना 14 मार्चला घडली. टाइम्स ऑफ इंडिया इमारत आणि अंजूमन इस्लाम शाळेजवळ हा पादचारी पूल असून या दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला तर 31 जण जखमी झाले. हा पूल महापालिकेपासून अगदी हाकेच्या अंतरावर आहे.त्यामुळे रेल्वे प्रशासन आणि  महापालिका या  दुर्घटनेची जबाबदारी कोणाची याबाबत वाद होता. यानंतर सीएसएमटी येथील हिमालय पूल दुर्घटने संबंधी दोषी असणारे डी.डी.देसाईज या कंपनीच्या नीरजकुमार देसाई यांच्या अटक करण्यात आली. आणि आता  महानगरपालिकेचे  सहाय्यक अभियंता एस.एफ.काकुळते यांना निलंबित करण्यात आलं होते. या दुर्घटनेमध्ये सामान्यांचे बळी घेतलेल्या पूलाची काकुळते यांच्या निरीक्षणाखाली डागडुजी झाली होती. या  पार्श्वभूमीवर  दुर्घटनेस कारणीभूत एस.एफ.काकुळते यांना आझाद मैदान पोलिसांनी अटक केली आहे.

कोण आहे हा दुसरा अभियंता?

छत्रपती शिवाजी महाराज पूल दुर्घटनेत 6 जणांचा मृत्यू झाला.तर 31 जण जखमी झाले.

हिमालय पूल दुर्घटनेच्या स्ट्रक्चरल ऑडिट केलेल्या नीरजकुमार देसाई यांना दोषी ठरवत अटक करण्यात आली होती.

याच प्रकरणाच्या चौकशीतील एस. एफ. काकुळते या अभियंत्याचेही नाव समोर आले होते.

साधारण 2013-2014 साली काकुळते यांच्या निरीक्षणाखाली सीएसएमटी येथाल हिमालय पूलाची डागडुजी करण्यात आली होती.

या पूलाच्या सक्षमतेबद्दल त्यांना माहिती असताना या गोष्टीकडे दुर्लक्ष कसे झाले? हा प्रश्न उद्भवत आहे.

याच प्रकरणामध्ये सहाय्यक अभियंता एस.एफ. काकुळते यांना दोषी ठरवून त्यांचे निलंबन झाले होते.

आता अधिक तपासानंतर निलंबित केलेल्या काकुळते यांना आझाद मैदान पोलिसांनी अटक केली आहे.

कामातील असा कामचुकारपणा हा कुणाच्या तरी जीवावर बेतू शकतो याचे गांभीर्य अधिकारी मंडळींना दिसत नाही.

सामान्यांच्या जीवावर बेताणा-या अनेक घटना मुंबईत सर्रास घडत आहेत.

त्यामध्ये एल्फिस्टन पूल दुर्घटना असो किंवा हिमालय पूल दुर्घटना अशा अनेक घटनांचा समावेश आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.