Jaimaharashtra news

सीएसएमटी दुर्घटनेप्रकरणी महापालिका व रेल्वे अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल

मुंबई महापालिका मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर असणारा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जोडणारा पादचारी पूल कोसळला.यामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला.या दुर्घटनेला दबाबदार कोण? असा प्रश्न सर्वच स्तरातून विचारला जात आहे.या प्रकरणी रेल्वे प्रशासन आणि महापालिका एकमेकांवर आरोप करण्यात व्यस्त होते.या प्रकरणी पोलिसांनी रेल्वे आणि महापालिका अधिकाऱ्यांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.

रेल्वे प्रशासन आणि महापालिकेचे एकमेकांवर बोट

सीएसएमटीवरील दुर्घटना ही घडल्यानंतर या परिसरात बघ्यांनी प्रचंड गर्दी केली होती.

निवडणुकीच्या तोंडावर ही दुर्घटना घडल्यामुळे सर्वच पक्षांच्या नेत्यांनीही हजेरी लावली.

परिसरात एकच गोंधळ उडाला आणि मदतकार्यात अडथळे निर्माण होतं होते.

पुलाचा धोकादायक बनलेला स्लॅब पाडण्याचे कामही तातडीने हाती घेण्यात आले.

दादाभाई नवरोजी मार्गावरील वाहतूक बंदच ठेवण्यात आली होती.

या दुर्घटनेप्रकरणी पोलिसांनी महापालिका आणि रेल्वे प्रशासनातील अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

भारतीय दंड विधानातील कलम ३०४ (सदोष मनुष्यवध) अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पादचारी पुलावरुन सुरुवातीला रेल्वे आणि महापालिका प्रशासन एकमेकांकडे बोट दाखवण्यात व्यस्त होती.

रेल्वे स्थानकाच्या हद्दीतील हा पूल महापालिकेच्या अंतर्गत येतो,असं रेल्वे प्रशासनाचे म्हणणं होत.

हा संपूर्ण पूल रेल्वेच्या हद्दीत असल्याचे महापालिकेचे म्हणणे होते.

Exit mobile version