Tue. Nov 24th, 2020

सीएसएमटी पूल दुर्घटनेप्रकरणी चौघांवर कारवाई 

छत्रपती शिवाजी टर्मिनस स्थानकाजवळील दादाभाई नौरोजी मार्गावरील हिमालय पादचारी पूल गुरुवारी  सायंकाळी 7.30 च्या सुमारास  गर्दीच्या वेळी कोसळला. या दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला आहे.तर ३१ जण जखमी झाले आहेत.  मुंबई महापालिकेकडून या दुर्घटनेसाठी जबाबदारांवर कारवाई करण्यात आली आहे. पूल दुर्घटने प्रकरणातील अभियंत्यांना तातडीने निलंबित करण्यात आले  तर निवृत्त अभियंत्यांची चौकशी केली जाणार  आहे.

या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर  मुंबईतील २९६ पुलांचं पुन्हा ऑडीट करण्यात येणार आहे. स्ट्रक्चरल ऑडिटचा चुकीचा अहवाल देणाऱ्या देसाई कन्सल्टन्सला काळ्या यादीत टाकण्यात आलं आहे. आणि कंत्राटदार आरपीएस कंपनीला कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली आहे.या पुलाच्या जबाबदारीसाठी  महापालिका आणि रेल्वे प्रशासनात टोलवाटोलवी सुरु होती. पण अखेर महापालिकेने हा पूल आमचाच असल्याचं मान्य केलं आहे. दरम्यान पोलिसांच्या प्राथमिक तपासातही हा पूल पूर्णपणे पालिकेचा असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पूल दुर्घटनेनंतर दुसऱ्या दिवशी संबंधीत कारवाई करण्यात आली आहे.

पूल  दुर्घटनेप्रकरणी ‘यांच्यावर’ कारवाई

या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर  मुंबईतील २९६ पुलांचं पुन्हा ऑडीट होणार

स्ट्रक्चरल ऑडिटचा चुकीचा अहवाल देणाऱ्या देसाई कन्सल्टन्स काळ्या यादीत

कंत्राटदार आरपीएस कंपनीला कारणे दाखवा नोटीस

मुख्य अभियंता एस. ओ. कोरी , ए. आर. पाटील, उपमुख्य अभियंता आर.बी.तारे आणि सहाय्यक अभियंता एसएफ काकुळते यांचं निलंबन

रेल्वे आणि महापालिका अधिकाऱ्यांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

आझाद मैदान पोलिसांत कलम 304 एअंतर्गत हा गुन्हा नोंदवला असून, प्रकरणाचा तपास सुरू

या याचिकेवर २२ मार्च रोजी मुंबई हायकोर्टात सुनावणी

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *