Wed. Jan 19th, 2022

रेल्वेमंत्री जबाबदारी झटकतील आणि मुंबईकर भरडत राहतील – राज ठाकरे

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथील अंजूमन इस्लाम शाळेजवळील पादचारी पुलाचा स्लॅब गुरुवारी संध्याकाळी कोसळला. या दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला तर 31 जण या दुर्घटनेत जखमी झाले आहेत. या दुर्घटनेमुळे राज ठाकरे यांनी रेल्वेमंत्र्यांना लक्ष केलं आहे. रेल्वेमंत्री नेहमीप्रमाणे ट्विटरवरुन चौकशीचे आदेश कसे दिले, याची टिमकी वाजवतील, जबाबदारी झटकतील आणि मुंबईकर भरडले जात राहतील. अशा शब्दात राज ठाकरे यांनी सुनावले आहे. “सप्टेंबर २०१७ रोजी एल्फिन्स्टन रोड स्थानकात चेंगराचेंगरी झाली होती. जुलै २०१८ साली अंधेरीतही असाच एक पादचारी पूल कोसळला होता. आणि आता सीएसएमटी स्थानकातील पूल कोसळला.तरीही प्रशासनाचे दुर्लक्षचं आहे.

राज ठाकरे बरसले

ही घटना दुर्दैवी आहे आणि मनसे अपघातग्रस्तांच्या आणि त्यांच्या नातेवाईकांच्या दु:खात सामील आहे.

रेल्वेमंत्री नेहमीप्रमाणे ट्विटरवरुन चौकशीचे आदेश कसे दिले, याची टिमकी वाजवतील,

रेल्वेमंत्री जबाबदारी झटकतील आणि मुंबईकर भरडत राहतील.

मनसेने सनदशीर मार्गाने संबंधित यंत्रणांकडे पाठपुरावा करूनही तो  त्यांना समजला नाही हे दुर्दैव आहे.

मुंबईतील पुलांचे ऑडिट करु असे फक्त आश्वासन देण्यात आले.

मी महापालिका आयुक्तांनाही भेटलो तेव्हा त्यांनी  सहकार्याचे आश्वासन दिले. पण पुढे काहीच घडले नाही, हे या दुर्घटनेमुळे सिद्ध झाले”,

 

 

 

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *