Fri. Sep 30th, 2022

काकडीचे होणार फायदे आणि तोटे जाणून घेऊया

काकडी ही स्वादिष्ट असल्यानं अनेकांना काकडी आवडते. काकडीचा वापर हा सलादमध्ये केल्या जाते. शिवाय काकडी हे एक पित्तशामक फळ आहे. जगभरात काकडीला विशेष महत्त्व आहे. सलादच्या व्यतिरिक्त उपवासात फराळात काकडीचा उपयोग करतात. तसेच काकडी ही उष्णतेचा त्रास कमी करते आणि तहान भागवते जेवनात बरेच लोक काकडी खातात.

काकडीचे फायदे :

काकडी ही पोटाच्या विकारासाठी उपयोगी असून बद्धकोष्ठतामध्ये काकडी औषधीच्या रुपात उपयोगी पडते. तसेच काकडीत मोठ्या प्रमाणात फाइबर असतात. काकडी ही ज्वर, शरीर दाह, कावीळ, तहान, गर्मी चे सगळे दोष, चर्म रोगात काकडी लाभदायक आहे. तसेच काकडीचा रस किंवा पेस्ट चेहर्यावर लावल्यास डाग, सनटॅन, झाकरे, सुरकुत्या, मुरुमांचा त्रास दूर होतो. चेहरा स्वच्छ, चमकणारा आणि मऊ दिसतो. याशिवाय, फेसपॅक लावल्यावर डोळ्यांवर काकडी लावल्याने डोळ्याखाली काळे डाग कमी होतात. भूक मंदावली असल्यास काकडीचे काप करुन काळे मीठ, पुदिना, लिंबू रस, मिरे आणि जिरेपूड घालून खावेत. यामुळे भूक चांगली लागते. किडनी स्टोन असणाऱ्या व्यक्तीनी तर काकडीचे सेवन करायला हवे. लघवीत होणारी जळजळ, लघवी थांबुन होणे, मधुमेह यासाठी काकडी लाभदायक आहे. काकडी, गाजर आणि पालकांचा रस पिल्याने केस मुळांपासून मजबूत होतात. केसांच्या वेगवान वाढीसह केस गळती, डोक्यातील कोंडाची समस्या सुटते, अशा परिस्थितीत केस लांब, जाड, रेशमी, गुळगुळीत, चमकदार दिसतात.

काकडी खाण्याचे तोटे : 

काकडी धुवून चांगले खा. त्यात त्याच्या सालावर विष असू शकते. यामुळे ते सोलून खाणे चांगले. काकड्यांचा जास्त प्रमाणात सेवन केल्यामुळे अपचन, आंबटपणा येऊ शकते. काकडीमध्ये जास्त पाणी असल्यानं आपल्याला वारंवार लघवी होण्याच्या समस्येचा सामना करावा लागू शकतो. काकडी जास्त सेवन केल्यानं चेहऱ्यावर, खाज सुटणे, घश्यात सूज येणे यासारख्या अॅलर्जी होऊ शकतात.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.