हल्दीराम रेस्टॉरंटमध्ये आढळलं सांबारात पालीचं मेलेलं पिल्लू!

नागपूरमधील अजनी चौक येथील ‘हल्दीराम रेस्टॉरंट’मध्ये धक्कादायक प्रकार घडलाय. एका ग्राहकाच्या सांबारामध्ये चक्क पालीचं मेलेलं पिल्लू आढळून आलंय. यासंदर्भात अन्न आणि औषध प्रशासनाकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.
काय घडलं नेमकं?
नागपूरमधील हल्दीराम रेस्टॉरंट या प्रसिद्ध रेस्टॉरंटमध्ये यश अग्निहोत्री नामक ग्राहकाबरोबर अत्यंत धक्कादायक प्रकार घडला.
ते खात असलेल्या सांबारामध्ये चक्क पालीचं मेलेलं पिल्लू आढळून आलं.
यामुळे यश अग्निहोत्री आणि नेहा अग्निहोत्री या दोघांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
आता त्यांची प्रकृती गंभीर नसल्याचं सांगण्यात येतंय.
मात्र या प्रकारामुळे मोठमोठ्या आणि नामांकित रेस्टॉरंट्समध्येही hygiene संदर्भात होत असलेली हेळसांड समोर आली आहे.