Fri. Jun 5th, 2020

#CWG2018 – नेमबाज श्रेयसी सिंगची धडाकेबाज कामगिरी

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

21 व्या राष्ट्रकुल स्पर्धेच्या सातव्या दिवशी भारताच्या पदकांची संख्या 24 वर पोहचली आहे.वेटलिफ्टर्सपाठोपाठ भारतीय नेमबाजांनीही यंदाच्या राष्ट्रकुल स्पर्धेत पदकांचा वर्षाव केला आहे. नेमबाज श्रेयसी सिंगने महिलांच्या डबल ट्रॅप प्रकारात सुवर्णपदक पटकावलं. तर पुरुषांच्या डबल ट्रॅपमध्ये अंकुर मित्तलने कांस्यपदकाची कमाई केली. भारताने आतापर्यंत 12 सुवर्ण, 4 रौप्य आणि 8 कांस्य पदकांची कमाई केली आहे

त्याआधी, नेमबाज ओम मिथरवाल याने 50 मीटर एअर पिस्टल प्रकारात कांस्यपदकाची कमाई केली होती. मिथारवलने यापूर्वी 10 मीटर एअर पिस्टलमध्ये ब्राँझपदक पटकावले होते. तर दुसरीकडे बॉक्सिंगमध्ये मेरीकोम फायनलमध्ये पोहोचली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *