Sat. Jul 4th, 2020

#CWG2018 – कुस्तीपटू बबिता फोगाटचे सुवर्णपदक हुकले

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

भारतीय महिला गटातील आघाडीची कुस्तीपटू बबिता फोगाटने राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्य पदकाची कामगिरी केली आहे. माञ सुवर्णपदकाला गवसणी घालण्याचे तिचे स्वप्न भंगले आहे. तरीही राष्ट्रकुल 2018 स्पर्धेत भारताच्या खात्यात आणखी एका पदकाची भर पडली आहे.महिलांच्या 53 किलो वजनी गटात बबिताने धडाकेबाज कामगिरी करत अंतिम फेरीपर्यंत उडी मारली होती. मात्र अंतिम लढतीत बबिताला कॅनडाच्या कुस्तीपटूकडून पराभव पत्करावा लागला. 

या पराभवामुळे बबिताला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. या लढतीत बबिताने कॅनडाच्या डायना वेईकेरला कडवी झुंज दिली. सुरुवातीला चुरशीच्या झालेल्या या लढतीत बबिताने एकवेळ 2-1 अशी आघाडी मिळवली होती.

मात्र डायनाने पलटवार करताना सलग तीन गुण घेत बबिताला पराभवाचा धक्का दिला. ग्लास्गो 2014 च्या राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये 55 किलो वजनी गटामध्ये बबिताने सुवर्ण कामगिरी केली होती. तर 2010 दिल्ली राष्ट्रकुल स्पर्धेत बबिताला कांस्य पदक मिळाले होते. 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *