Sat. Jul 4th, 2020

#CWG2018 – बीडच्या पैलवानाला सुवर्णपदक

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

महाराष्ट्राचा पठ्ठा राहूल आवारे याने राष्ट्रकुलचं मैदान गाजवलं. बीडचा पैलवान राहुल आवारेने राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेच्या 57 किलो फ्रीस्टाइल गटात सुवर्णपदकाची कमाई केली.

निर्णायक कुस्तीत राहुल आवारेचा मुकाबला कॅनडाच्या स्टीव्हन ताकाहाशीशी होता. राहूलने ताकाहाशीचा कडवा संघर्ष 15-7 असा आठ गुणांनी मोडून काढला आणि सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलं.
गोल्ड कोस्टच्या भूमीतलं गोल्ड हे राहुल आवारेनं आंतरराष्ट्रीय कुस्तीत मिळवलेलं हे तिसरं मोठं यश होतं. याआधी 2011 साली त्यानं राष्ट्रकुल कुस्तीत सुवर्ण आणि आशियाई कुस्तीत कांस्य अशी कामगिरी बजावली आहे. राहुलनं आजवरच्या कारकीर्दीत 21 लहानमोठ्या पदकांची कमाई केली आहे. त्यात राष्ट्रीय कुस्तीतल्या सलग सहा विजेतीपदांचाही समावेश आहे.

राहुल आवारे हा मूळचा बीड जिल्ह्यातल्या पाटोद्याचा पैलवान. तसं पाहिलं तर आवारे कुटुंब हे मूळचं नगर जिल्ह्यातल्या माळेवाडीचं. भारतीय कुस्ती महासंघानं राहुलवर बेशिस्त वर्तनासाठी बंदीची कारवाई केली होती. या कारवाईमुळे राहुलची तुर्कस्तानच्या इस्तंबूलमधल्या दुसऱ्या ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत खेळण्याची संधी हुकली होती. मात्र राहुल आवारेने आपल्याला ऑलिम्पिकमधून हटवलं असलं, तरी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत करुन दाखवलं.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *