Mon. Dec 16th, 2019

इंग्लंडसह 74 देशांवर सायबर अ‌ॅटॅक, रूग्णालयांवर मोठा परिणाम

वृत्तसंस्था, इंग्लंड

इंग्लंडमधील रूग्णालयांवर मोठा सायबर हल्ला झाला आहे. ‘नॅशनल हेल्थ सर्विस’शी संबंधित संगणकांवर हा हल्ला करण्यात आला असून संगणक हॅक करण्यात आले आहेत. त्यामुळे इंग्लंडमधील संपूर्ण आरोग्य यंत्रणा विस्कळीत झाली आहे.

 

या सायबर हल्ल्याची झळ युरोप, अमेरिकेसह जवळपास 74 देशांना बसल्याची शक्यता सुरक्षा यंत्रणांनी व्यक्त केली आहे. स्पेनच्या अनेक कंपन्यातील सॉफ्टवेअरही सायबर हल्ल्यामुळे बाधित झाले आहे. तसेच स्पेनमधील दूरसंचार कंपनी टेलीफोनिकाच्या सेवादेखील सायबर हल्ल्याने विस्कळीत झाल्या आहेत.

‘रेन्समवेअर’द्वारे हा सायबर हल्ला करण्यात आल्याचं वृत्त आहे. ‘रेन्समवेअर’द्वारे हॅक केल्यास हॅकरच्या तावडीतून सोडवणं कठीण असतं आणि शक्यतो त्यासाठी पैशांची तोडजोड केली जाते.

 

सायबर हल्ल्यामुळे इंग्लंडच्या काही प्रांतांमधील इस्पितळे बंद केली असून, अत्यंत निकडीच्या स्थितीतच वैद्यकीय सेवा घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *