Sat. Sep 18th, 2021

EVM हॅकिंग, गोपीनाथ मुंडेंचा मृत्यू आणि हॅकर्सचे दावे!

लंडन येथे झालेल्या गुप्त हॅकर पत्रकार परिषदेत भारतीय निवडणुकांत EVM मशीन्स हॅक झाल्याचा खळबळजनक दावा करण्यात आला आहे. या हॅकिंगची माहिती गोपीनाथ मुंडे यांना असल्यामुळेच त्यांची हत्या करण्यात आल्याचंही यावेळी हॅकर सय्यद शुजा याने म्हटलंय.

सय्यद शुजाने केलेल्या धक्कादायक आरोपांनंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने दिल्ली पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणीही करण्यात आली आहे.

मुंडे यांच्या हत्येचा तपास अधिकारी तंजील अहमद करत होते. त्यांचीही हत्या करण्यात आली असल्याचा दावा सैयदने केला आहे.

मुंडे यांची हत्या दुर्घटनेत झाली नसल्याचं तपासात आढळून आलं होतं.

 

 

EVM झाले होते हॅक?

London येथे ‘Hackathon’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ‘EVM machine hack केली जाऊ शकते’, असे या कार्यक्रमात सांगण्यात आले होते. Indian Journalist Association Europe यांच्या तर्फे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमाला काँग्रेसचे ज्येष्ठनेते कपील सिब्बल यांचीही उपस्थिती होती.

 

Reliance ने केली होती मदत

निवडणूकीच्या वेळेस BJPला Reliance ने मदत केली असल्याचा दावा Experts नी केला आहे.

Delhi निवडणुकीच्या वेळी EVM machine मध्ये transmission थांबवल्यामुळे BJP अपयशी ठरली होती.

निवडणुकीचं ट्रांसमिशन Aam Aadmi Partyकडे वळवल्यामुळे आपचा विजय झाला होता.

असे दावे यावेळी करण्यात आले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *