Wed. Nov 13th, 2019

‘फोनी’ चा वेग ओसरला; बांग्लादेशच्या दिशेने आगेकूच

पाऊस आणि वाऱ्याचा जोर धरत फोनी शुक्रवारी ओडिशाच्या किनारपट्टीवर येऊन थडकले. या वादळाने 8 नागरिकांचा बळी घेतला असून सुमारे 11 लाख नागरीकांचे स्थलांतर करण्यात आले होते. ओदिशानंतर फोनी  चक्रीवादळ शनिवारी पश्चिम बंगालमध्ये धडकले आहे. ओदिशापेक्षा पश्चिम बंगालमध्ये वादळाची तीव्रता कमी आहे. 90  किलोमीटरच्या ताशी वेगाने या वादळाने पश्चिम बंगालमध्ये या वादळाने हजेरी लावली आहे. या वादळाचा परिणाम पश्चिम बंगालच्या जनजीवनावर झाला आहे. परंतु पश्चिम बंगालमधील या वादळाची तीव्रता कमी झाली असून   70- 80  किमीच्या वेगाने बांग्लादेशच्या दिशेने आगेकूच केली आहे.  या चक्रीवादळाचा वेग बराच कमी झाला आहे. हे वादळ दुपारपर्यंत बांग्लादेशच्या किनाऱ्यावर थडकणार आहे.

पश्चिम बंगालमध्ये जनजीवन विस्कळीत

गेल्या काही दिवसांपासून फोनी या भीषण चक्रीवादळाने हाहाकार माजवला आहे.

फणी पुरीच्या किनारपट्टीवर येऊन थडकल्यावर खुर्दा, कटक, भद्रक आणि बालासोर याठिकाणी हजेरी लावली.

या वादळामुळे शुक्रवारी आदिशामध्ये 8 जणांचे बळी घेतले आहेत.

आदिशामध्ये अनेक घरे, झोपड्या उद्वस्त झाले आहेत. 11 लाख लोकांचे स्थलांतर करण्यात आलं आहे.

शनिवारी चक्रीवादळ खडगपूर ओलांडून पश्चिम बंगालमध्ये हजर झाले आहे.

चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर कोलकाता विमानतळ बंद ठेवण्यात आले आहे.

पश्चिम बंगालमधील तब्बल २२० एक्स्प्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

लोकांनी कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केलं आहे.

दरम्यान फोनी वादळाची तिव्रता झाली कमी झाल्याने कोलकाता विमानतळाचे कामकाज सुरू करण्यात आली आहे.

बांग्लादेशच्या दिशेने आगेकूच

या चक्रीवादळाचा वेग बराच कमी झाला आहे.

मुर्शिदाबाद, मिदीनापूर या ठिकाणी आधीच पावसाने हजेरी लावली आहे.

आज दुपारपर्यंत हे वादळ बांग्लादेशमध्ये पोहचणार अशा शक्यता वर्तवण्यात आली आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *