Thu. Dec 12th, 2019

तामिळनाडूत ‘गाजा’ चक्रीवादळाचे 2 बळी

बंगालच्या उपसागरात तयार झालेले गाजा चक्रीवादळ तामिळनाडूच्या किनारपट्टीवर धडकले आहे. गाजाच्या परिणामामुळे अनेक भागांत मूसळधार पाऊस होत आहे. 120 किमी प्रति तासाच्या वेगाने वारे वाहत आहेत.

खबरदारी म्हणून तामिळनाडू किनारपट्टीच्या भागातील सुमारे 76 हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. या बचावकार्यासाठी सुमारे 30 हजार  कर्मचारी तैनात आहेत.

शैक्षणिक कामकाजावर देखील याचा परिणाम होणार आहे. शाळा-महाविद्यालयं आज बंद ठेवण्यात आले आहेत. तर तिरुचिरापल्ली-रामेश्वरम आणि रामेश्वरम-चिरुचिरापल्ली पॅसेंजर रेल्वे आज रदद् होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *