समुद्रात अडकलेल्या १७७ व्यक्तींची सुटका

अरबी समुद्रात निर्माण झालेलं तौते चक्रीवादळ सोमवारी मुंबईपासून गुजरातच्या दिशेनं गेलं.रौद्रवतार धारण केलेल्या या चक्रीवादळामुळे कोकण किनारपट्टी, मुंबईसह इतर शहरांना फटका बसला आहे.

मुंबईपासून सुमारे ७ नॉटिकल माईल्सच्या पश्चिम दिशेला समुद्रात ४१० जण वादळात अडकले आहेत. नौदलाला जीएल कंस्ट्रक्टर जहाजावरून बचावाचा संदेश मिळाला होता. या जहाजावर १३७ लोकं आहेत. तसेच हिरा ऑयल फील्ड्स जवळ दुस-या जहाजावर २७३ जण अडकलेले आहेत. आतापर्यंत ४१० पैकी १७७ लोकांना वाचविण्यात आले आहे.

आयएनएस कोची आणि आयएनएस तलवार या दोन जहाजांना घटनास्थळी पाठवले आहे. उर्वरित अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी बचावकार्य सध्या सुरू आहे. इतर जहाज आणि विमानेही बचावासाठी तयार ठेवण्यात आले आहे.

Exit mobile version