उत्तर प्रदेशमध्ये सिलेंडरच्या स्फोटात इमारत कोसळून 11 जणांचा मृत्यू, 15 जखमी

उत्तर प्रदेशमध्ये मऊ येथे सकाळी सिलेंडरचा स्फोट झाला आणि यामध्ये दोन मजली इमारत कोसळली आहे. यामध्ये 11 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 15 जण जखमी झाले आहेत. या स्फोटातील ढिगाऱ्याखाली आणखी लोक अडकल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

सकाळी या परिसरात स्फोटाचा मोठा आवाज झाला. याचा हादरा आजूबाजूच्या भागात बसल्याने लोक घराबाहेर पडले. या स्फोटामुळे दोन मजली इमारत सहज कोसळली आहे. यावेळी लगेच बचावकार्य सुरू करण्यात आले. पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले आहे.

जखमींवरती जवळच्या रूग्णालयात उपचार सूरू आहेत. अचानकच ही घटना घडल्यामुळे लोकांना वाचविण्यासाठीचे प्रयत्न कमी पडले. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेवर शोक व्यकत असून जखमींवर तत्काळ योग्य ते उपचार करण्यास सांगीतले आहे.

Exit mobile version