Tue. May 18th, 2021

‘दबंग 3’ पाहिलात का? जाणून घ्या कसा आहे हा सिनेमा

‘दबंग’ आणि ‘दबंग 2’ नंतर आता सलमान खान आपल्या प्रेक्षकांसाठी ‘दबंग 3’ घेऊन आला आहे. आधीच्या दोन्ही सिनेमांनी तिकीटबारीवर धुमाकूळ घातला होता. त्यामुळे तिसरा भागही तितकाच धमाकेदार असेल का, याबद्दल चाहत्यांना उत्सुकता आहे. विशेष म्हणजे यावेळी सिनेमाची कथाही सलमान खाननेच (Salman Khan) लिहिली आहे, तर दिग्दर्शन प्रभूदेवाने केलंय. प्रभूदेवाच्याच Wanted सिनेमापासून सलमान खानच्या ब्लॉकबस्टर सिनेमांचा धडाका सुरू झाला होता.

कसा आहे हा सिनेमा?

‘दबंग 2’ हा पहिल्या ‘दबंग’ सिनेमाची कथा पुढे घेऊन जाणारा होता. मात्र Dabangg 3 मात्र कथा मागे नेतो. म्हणजे या कतेत चुलबूल पांडेच्या आयुष्यातला जुना भाग येतो. ‘रज्जो’ (Sonakshi Sinha) ला भेटण्यापूर्वी चुलबूल पांडेच्या आयुष्यात आलेलं पहिलं प्रेम या सिनेमात दिसतं. त्याचं पहिलं प्रेम ‘खुशी’ (Saiee Manjrekar) हिच्यासोबतची love story या सिनेमात पाहायला मिळते. पहिल्या दोन सिनेमांप्रमाणेच या सिनेमात धमाकेदार action आहे. त्यासाठी या सिनेमात खलनायकही तगडा आहे. कन्नडा सिनेसृष्टीतील सुपरस्टार सुदीप (Keecha Sudeepa) या सिनेमात सलमानला भिडलाय.

सलमान खानने नेहमीप्रमाणेच कॉमेडी आणि action चा तडका या सिनेमात दिलाय. आपल्या फॅन्सचा पूर्ण पैसा वसूल होईल, याची त्याने काळजी घेतली आहे. सुदीपचा अभिनयही तितकाच चांगला आहे. ‘खुशी’च्या भूमिकेतून सई मांजरेकरला मिळालेल्या संधीचं तिने सोनं केलंय. तिच्या वाट्याला आलेल्या भूमिकेला तिने न्याय दिलाय. सोनाक्षी सिन्हाला या सिनेमात फारशी संधी मिळालेली नाही. अरबाझ खानच्या ‘मख्खी सिंग’लाही सिनेमात जास्त वाव नाही. सलमान खानने मात्र नेहमीप्रमाणेच तर्कशास्त्राला खुंटीला टांगून अतिरेकी सीन केले आहेत. मात्र त्याच्या चाहत्यांना हा अभिनय आवडेल हे नक्की. सिनेमाची लांबी थोडी जास्त वाटते. मात्र सिनेमाभर सलमान खानच दिसत राहतो. एकूणच हा सिनेमा सलमानच्या चाहत्यांसाठी असल्याने हा सिनेमा त्यांना नक्की आवडेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *