Wed. May 22nd, 2019

मुंबईच्या डब्बेवाल्यांसाठी ‘डब्बेवाला भवन’ उभारणार

98Shares

महापालिका सभागृहात एकमताने ठराव मंजूरमुंबईच्या डब्बेवाल्यांना ख्याती विदेशातही पोहोचली आहे.दिवसभरात लाखो डब्बे हे डब्बेवाले पोहचवत असतात.

त्यांना महापालिकेने दिलासा दिला आहे. डब्बेवाल्यांना हक्काचे ठिकाण मिळावे आणि कुटुंबांना सुविधा उपलब्ध करुन देता याव्यात यासाठी मुंबईत ‘डब्बेवाला भवन’ उभारण्याचा ठराव मांडण्यात आला हा ठराव पालिका सभागृहात एकमताने मंजूर करण्यात आला आहे.

प्रशासनाकडून हिरवा कंदिल दाखविल्यानंतर मुंबईत ‘डब्बेवाला भवन’ उभारण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

दररोज लाखो डब्यांचे वितरण

मुंबईमधील विविध ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना घरचा जेवणाचा आस्वाद घेता येणार यावा  यासाठी डब्बा पोहोचविण्याचं काम १८७० मध्ये या डब्बेवाल्यांनी सुरु केलं.

मुंबईत कंपन्या, उद्योग, कारखान्यांच्या संख्येत वाढ होत आहे. आणि नोकरदारांना घरच्या जेवणाचा डब्बा पोहोचविण्याचे काम अविरतपणे सुरू आहे.

तब्बल दोन लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना जेवणाचा डब्बा पोहोचविण्याचे काम डब्बेवाले करीत आहेत.

मुंबईच्या डब्बेवाल्यांच्यी महती विदेशात पोहोचली असून विविध देशांमधून मुंबई भेटीसाठी येणारे पर्यटक आणि शिष्टमंडळेही आवर्जून डब्बेवाल्यांची भेट घेतात.

परदेशी शिष्टमंडळांना डब्बेवाल्यांची भेट घेता यावी यासाठी मुंबईत मध्यवर्ती ठिकाणी ‘डब्बेवाला भवन’ उभारण्यात यावे, अशी मागणी नगरसेविका किशोरी पेडणेकर यांनी पालिका सभागृहात मांडली होती.

डब्बेवाल्यांना आपल्या समस्या सोडविता याव्या, औषधोपचारासाठी मुंबईत येणाऱ्या डब्बेवाल्यांच्या कुटुंबियांची निवासाची सुविधा उपलब्ध करता यावी यासाठी ‘डब्बेवाला भवना’त सुविधा उपलब्ध करता येतील

आयुक्तांनी हिरवा कंदिल दाखविल्यानंतर ‘डब्बेवाला भवना’च्या उभारणीचा मार्ग मोकळा होईल.

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *