डॉ. दाभोळकर हत्येप्रकरणी सीबीआयला मोठं यश

डॉ नरेंद्र दाभोळकर हत्ये प्रकरणी सीबीआयला मोठं यश आलं आहे. ज्या बंदुकीने दाभोळकरांवर हल्ला करण्यात आला, ती बंदूक सीबीआयने शोधून काढली आहे.

ही बंदूक सीबीआयला ठाणे नजीकच्या समुद्र खाडीत सापडली आहे.

ही बंदूक शोधून काढण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेतली गेली. यासाठी नॉर्वेवरुन डीपीसी एक्सप्लोरर तंत्रज्ञानाचा उपयोग केला गेला. तंत्रज्ञानासाठी तब्बल ७ कोटी ५० लाख खर्च केला गेला.

नरेंद्र दाभोळकरांची २० ऑगस्ट २०१३ ला पुण्यातील महर्षी शिंदे पुलावर गोळ्या घालून हत्या केली होती.

हत्येनंतर मारेकऱ्यांनी ही बंदूक खारेगावमधील खाडीत फेकली होती.

ही बंदूक खाडीत टाकल्याची माहिती सीबीआयला चौकशी दरम्यान दिली होती.

परंतु खाडीत टाकलेली बंदूक शोधणं कठीण होतं.

मात्र मुंबई उच्च न्यायालयाकडून सी बी आयला त्याबाबत सातत्याने धारेवर धरलं जात होतं.

ही बंदूकीचा शोधण्यासाठीचं काम दुबईतील एका कंपनीला दिलं होतं.

या कंपनीने नॉर्वेवरुन बंदूक शोधणारं यंत्र मागवलं. यानंतर या यंत्रात्या साह्ययाने पाण्याखाली विशिष्ट प्रकारच्या मॅग्नेट्या मदतीने बंदुकीचा शोध घेतला गेला.

दाभोळकरांच्या हत्येतील आरोपींचे धागेदोरे कॉम्रेड गोविंद पानसरे,आणि कर्नाटकात झालेल्या एम एम कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्या हत्येशी जोडले गेले होते.

पानसरे यांच्या हत्येचा तपास महाराष्ट्र एसआयटी करत होती. यामुळे महाराष्ट्र एसआयटी आणि कर्नाटक पोलिसांसाठी ही बंदूक सापडणं महत्वाचं होतं.

त्यामुळे आधुनिक पद्धतीने बंदुकीचा शोध घेणारं तंत्रज्ञान नॉर्वेवरुन मागवण्यात आलं. यासाठी तब्बल ७ कोटी रुपयांचा खर्च आला. हा खर्च महाराष्ट्र आणि कर्नाटक पोलीस तसेच सीबीआयने एकत्रिकपणे केला.

खारगाव खाडीतील पिस्तुल सापडली. यानंतर ही बंदूक अधिक तपासणीसाठी फॉरेन्सीक लॅबमध्ये पाठवण्यात आली आहे.

बंदूक सापडल्यानं या सर्व प्रकरणातील तपासाला वेग मिळेल, अशी अपेक्षा सर्वांना आहे. दरम्यान दाभोळकरांच्या हत्येप्रकरणी एकूण ५ जणांना अटक केली आहे.

Exit mobile version