‘दादर Metro 3 स्टेशन’ला ‘शिवसेना भवन’ नाव देण्याची मागणी!

समृद्धी महामार्गाला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्याच्या मागणीनंतरआता शिवसेनेने आणखी एक मागणी केली केली. मेट्रो 3 प्रकल्पतील शिवसेना भवनजवळील स्टेशनला  त्याकरीता शिवसेना खासदार अनिल देसाई यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले.

कोणतं नाव देण्याची मागणी ?

Metro 3 प्रकल्पातील रेल्वे स्थानकांना त्या ठिकाणच्या ओळखीनुसार सिद्धिविनायक, शितला देवी, सायन्स म्यूझियम अशी नावे देण्यात आली आहे.

त्यामुळे शिवसेना भवन येथील Metroच्या स्थानकाला “शिवसेना भवन” असं नाव देण्याची मागणी केली आहे.

प्रवाशांचा गोंधळ न होण्यासाठी Metro 3 प्रकल्पातील ‘Dadar’ रेल्वे स्थानकाला ‘शिवसेना भवन’ नाव देण्याचीही मागणी केली आहे

दरम्यान स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचं नाव ‘समृद्धी महामार्गाला’ देण्याची मागणीही याआधी केली होती.

तर याच महामार्गाला ‘अटल बिहारी’ वाजपेयी यांचं नाव देण्याची मागणी BJP कडून करण्यात आलेली.

Exit mobile version