Fri. Jun 18th, 2021

दादर स्थानकातील ‘तो’ पूल धोकादायक ?; सुरक्षेच्या दृष्टीने बंद 

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाजवळील हिमालय पादचारी पूल पडल्यानंतर मुंबईमधील सगळ्याच पादचारी पूल, उड्डाणपुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

याच पार्श्वभूमीवर संरचनात्मक तपासणीसाठी दादर स्थानकातील पश्चिम रेल्वेचा प्लॅटफॉर्म क्रमांक 2 आणि 3वरुन फुल बाजारात जाणारा पूल बंद करण्यात आला आहे.

त्यामुळे गर्दीच्या वेळी दादर स्थानकातून प्रवास करणाऱ्या मुंबईकरांना स्थानकातील मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या प्लॅटफॉर्मना जोडणारा मोठा पूल वापरण्याची सुचना करण्यात आली आहे.

आज सकाळपासूनच दादर स्थानकातील मांटुंगा रोडच्या बाजूचा प्लॅटफॉर्म क्रमांक 2-3वरुन सुरु होऊन फूल बाजारच्या बाजूला उतरणारा फूल रहदारीसाठी बंद करण्यात आला आहे.

त्यामुळे दादर स्थानकामध्ये पश्चिम रेल्वेच्या मार्गावर ये-जा करणाऱ्या प्रवाशांना मोठा पूल वापरण्याशिवाय पर्याय उरलेला नाही.

यासंदर्भात कोणतीही पूर्व सुचना न देता पूलाची तपासणी सुरु करण्यात आल्याने आज सकाळी प्रवाशांचा गोंधळ उडाला.

पश्चिम आणि मध्य रेल्वेवरील प्रवाशी संख्या पाहता दादर स्थानकातील मुख्य पुलावर प्रवाशांची गर्दी होण्याची शक्यता असल्याने पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आले आहे.

उद्घोषकांच्या मदतीने प्रवाशांना सुचनाही करण्यात येत आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज स्थानकाजवळचा हिमालय पादचारी पूल पडल्यानंतर मुंबईतील सगळ्याच पादचारी पूल, उड्डाणपुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

पालिकेने नेमलेल्या तांत्रिक सल्लागाराने ज्या पुलाला चांगल्या स्थितीत असल्याचा शेरा दिला आहे तोच पूल पडल्यामुळे ज्या पुलांना धोकादायक किंवा मोठ्या दुरुस्तीची आवश्यकता असल्याचे म्हटले आहे.

अशा पुलांची अवस्था काय असेल याची मुंबईकरांनी फक्त कल्पनाच करावी.

मुंबईत असे तब्बल 11 अतिधोकादायक पूल अजूनही उभे आहेत. तर 61 पुलांची मोठय़ा दुरुस्तीची आवश्यकता असल्याचे आधीच्या अहवालात म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *