Wed. Jan 19th, 2022

ज्येष्ठ अभिनेते रजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्कार

  दिल्लीत झालेल्या ६७व्या चित्रपट पुरस्कार सोहळ्यात साऊथचे मेगास्टार ज्येष्ठ अभिनेते रजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. भारतीय चित्रपट सृष्टीतील सर्वोच्च असलेला दादासाहेब फाळके पुरस्कार उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांच्या हस्ते रजनीकांत यांना प्रदान करण्यात आला. यावेळी रजनीकांत यांच्या कुटुंबातील सदस्यही पुरस्कार सोहळ्याला उपस्थित होते.

 अभिनेत्री कंगना रणावतला ‘मणिकर्णिका’ आणि ‘पंगा’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ठ अभिनेत्री पुरस्काराने गौरवण्यात आले. तर अभिनेता मनोज वाजपेयी यांना सर्वोत्कृष्ठ अभिनेता या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. २२ मार्च रोजी या पुरस्करांची घोषणा करण्यात आली होती. मात्र कोरोनाग्रस्त परिस्थितीमुळे या पुरस्कारांचे आयोजन करता आले नाही. आणि अखेरिस आजच्या दिनी हा सोहळा उत्साहात पार पडला.

  अभिनेत्री कंगना रणावतचा हा चौथा राष्ट्रीय पुरस्कार आहे. तसेच यापूर्वी कंगनाला ‘फॅशन’, ‘क्वीन’, ‘तनु वेड्स मनु रिटर्न्स’ या चित्रपटांसाठी पुरस्कार मिळाला आहे. अभिनेता मनोज वाजपेयी यांना ‘भोसले’ चित्रपटासाठी आणि साऊथ अभिनेता धनुष यांना ‘असूरन’ या तामिळ चित्रपटासाठी विभागून सर्वोत्कृष्ठ अभिनेत्याच्या पुरस्काराने गौरवण्यात आले. तसेच दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या ‘छिछोरे’ चित्रपटाला सर्वोत्कृष्ठ चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *