Wed. Apr 21st, 2021

दगडुशेठच्या बाप्पाला अलंकाराने मढवलं.

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे 

पुण्याचे प्रसिध्द दैवत म्हणुन ओळखले जाणारे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे यंदा शतकोत्तर रौप्यमहोत्सव वर्षानिमित्त नवीन दागिने तयार करण्यात आले आहे. तब्बल ४० किलो सोन्याचे दागिणे बाप्पासाठी तसार करण्यात आले आहे. यामध्ये आकर्षक नक्षीकाम, हत्ती शिल्प, मोरतुरे आणि नवग्रहांच्या समावेशासह 8 ते 10 हजार खडयांची सजावट असलेला साडेनऊ किलोचा मुकुट बाप्पासाठी साकारण्यात आला आहे. रत्नजडित खडयांनी नटविलेला 700 ग्रॅमचा शुंडहार, सूर्याच्या किरणांचा आभास निर्माण करणारे 2 किलोचे कान, तब्बल 4 हजार सुवर्ण टिकल्यांनी मणीकाम करुन चंद्रकोराची आभास निर्मिती करणारा अडीच किलोचा अंगरखा बाप्पाला अर्पण करण्यात येणार आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *